Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची गोलंदाज साना मिरने घडवला इतिहास, वन डे रँकिंगमध्ये अव्वल

पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार साना मिरने गुरुवारी इतिहास घडवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 10:40 IST

Open in App

दुबई : पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार साना मिरने मंगळवारी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) महिला क्रिकेट वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होणारी ती पाकिस्तानची पहिली खेळाडू ठरली आहे. आयसीसी महिला चॅम्पियन्सशीप मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तान संघाला 3-0 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, या मालिकेत तिची कामगिरी उल्लेखनीय झाली.

मिरने तीन सामन्यांत अनुक्रमे 3/26, 1/37 आणि 3/53 अशी कामगिरी केली आणि 663 गुणांसह महिला गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेताना दक्षिण आफ्रिकेच्या मॅरिझने कॅप्प आणि ऑस्ट्रेलियाच्या मीगन स्कट व जेस जोनासेन यांना मागे टाकले. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ''हे संघाचे यश आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी ही भरारी घेऊ शकले. आयसीसीचे आभार,'' असे मिरने ट्विट केले.   मिरने मागील 9 सामन्यांत 12.75 च्या सरासरीने 24 विकेट घेतल्या आहेत. 

टॅग्स :आयसीसीपाकिस्तान