मोठ्या हौसेने स्टेडियमवर पोहोचली सना जावेद; तिसऱ्या पत्नीसमोर शोएब मलिकची फजिती

पाकिस्तान सुपर लीग २०२४ ला सुरुवात झाली आणि शोएब मलिक ( Shoaib Malik ) पुन्हा चर्चेत आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 10:11 IST2024-02-19T10:11:30+5:302024-02-19T10:11:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sana Javed is supporting husband Shoaib Malik in the Multan Stadium, Malik scored 53 off 35 balls in PSL 2024  | मोठ्या हौसेने स्टेडियमवर पोहोचली सना जावेद; तिसऱ्या पत्नीसमोर शोएब मलिकची फजिती

मोठ्या हौसेने स्टेडियमवर पोहोचली सना जावेद; तिसऱ्या पत्नीसमोर शोएब मलिकची फजिती

पाकिस्तान सुपर लीग २०२४ ला सुरुवात झाली आणि शोएब मलिक ( Shoaib Malik ) पुन्हा चर्चेत आला... ४१ व्या वर्षी तिसरं लग्न केल्यामुळे शोएबसोबत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदही ( Sana Javed) चर्चेत आली होती. आता नवीन नवरी पतीला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली होती. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आणि शोएबनेही पत्नीसमोर दमदार फलंदाजी करून दाखवली, पण संघाचा दारूण पराभव तो टाळू शकला नाही.

सानियापूर्वी एका भारतीय मुलीसोबत Shoaib Malik ने थाटलेला संसार; कोण आहे आयेशा?


मुलतान सुलतान संघाने प्रथम फलंदाजी करताना शोएब मलिकच्या कराची किंग्ससमोर विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य ठेवले. मुलतानकडून डेवीड मलान याने ४१ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. रिझा हेंड्रिक्सनेही ५४ चेंडूंत ७९ धावा चोपल्या. खुशदील शाहने २८ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात कराची किंग्सला ८ बाद १३० धावाच करता आल्या. सलामीवीर शान मसूदने ३० धावा केल्या. पण मधल्या फळीने माती खाल्ली. शोएबने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ५३ धावा करून संघर्ष केला. किरॉन पोलार्डनेही नाबाद २८ धावा चोपल्या, परंतु कराची किंग्सला ५५ धावांनी हार पत्करावी लागली.


पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने २० जानेवारी २०२४ मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत कराचीमध्ये तिसरे लग्न केले आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याने पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेत्रीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होता.  सानिया व शोएब यांना एक मुलगा आहे आणि ५ वर्षांचा इझान भारतीय टेनिसपटूसोबत राहतो.
 

Web Title: Sana Javed is supporting husband Shoaib Malik in the Multan Stadium, Malik scored 53 off 35 balls in PSL 2024