Sam Curran Warning Team India And Indian Cricket Fans Ahead IND vs ENG Semifinal : भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ सगल तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्याआधी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन याने पॅट कमिन्सची कॉपी करत टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिले आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर शांतता पाहायला मिळेल, याची खात्री वाटते, असे म्हणत त्याने टीम इंडियाविरुद्धचा सामना जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काय म्हणाला सॅम करन?
भारतीय संघाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीआधी मंगळवारी सॅम करन याने पत्रकार परिषदेत संघ फायनलच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. तो म्हणालाकी, "गुरुवारी वानखेडे स्टेडियम शांत असेल, अशी मला खात्री आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात धावांची बरसात होईल. आम्ही कोणालाही घाबरत नाही. दोन्ही संघ या आव्हानासाठी उत्सुक आहेत. जर त्या दिवशी प्रेक्षक शांत राहिले, तर त्याचा अर्थ इंग्लंड चांगली कामगिरी करत आहे."
IND vs ENG, T20 WC 2026 2nd Semi Final : वानखेडेच्या खेळपट्टीवर 'गंभीर' चर्चा; कोचला काय खटकलं?
ऑस्ट्रेलियन कॅप्टनची कॉपी करत टीम इंडियाला ओपन चॅलेंज
सॅम करन याने वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांना कल्ला करु देणार नाही, असे म्हणत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलून सामना जिंकू, असे वक्तव्य करताना पॅट कमिन्सची कॉपी केली आहे. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी पॅट कमिन्स याने भारताविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरण्याआधी याच धाटणीत वक्तव्य केले होते. भारतीय प्रेक्षकांना शांत करणे समाधानकारक ठरेल, असे तो म्हणाला होता.
भारत-इंग्लंड यांच्यात जिंकेल तो ट्रॉफी जिंकेल, अशी रंगतीये चर्चा, कारण...
भारत-इंग्लंड यांच्यात याआधी २०२२ मध्ये पहिल्यांदा उपांत्य फेरीतील सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२४ च्या हंगामात हे दोन्ही संघ पुन्हा एकमेकांसमोर आले. यावेळी मात्र टीम इंडियाने पराभवाची परतफेड केली. कमालीचा योगायोग हा की, उपांत्य फेरीतील विजयानंतर आधी इंग्लंडच्या संघाने आणि मग भारतीय संघाने ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात वानखेडेचं मैदान गाजवेल तोच ट्रॉफी जिंकेल, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.
Web Summary : Sam Curran challenges India before the semi-final clash, echoing Pat Cummins' sentiments. He anticipates a quiet Wankhede, suggesting it signals England's dominance. History suggests the semi-final winner between India and England will claim the trophy.
Web Summary : सैम करन ने सेमीफाइनल से पहले भारत को चुनौती दी, पैट कमिंस की याद दिलाई। उन्होंने शांत वानखेड़े की उम्मीद जताई, जिसका अर्थ है इंग्लैंड का दबदबा। इतिहास बताता है कि भारत-इंग्लैंड के बीच सेमीफाइनल जीतने वाली टीम ट्रॉफी जीतेगी।