Join us

KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)

पहिल्या १३ चेंडूत फक्त १६ धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:16 IST

Open in App

Salman Nizar Smashed 11 sixes in the last 12 balls In Kerala Cricket League 2025 : केरळा टी-२० लीगमध्ये सलमान निजार नावाच्या फलंदाजाने आपल्या वादळी खेळीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. पहिल्या १३ चेंडूत फक्त १६ धावा करणाऱ्या सलमाननं अखेरच्या दोन षटकात धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश करत १२ चेंडूत ११ षटकाराच्या मदतीने ७० धावा कुटल्या. त्याची धमाकेदार खेळी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्या १३ चेंडूत फक्त १६ धावा

केरळा टी-२० लीगमध्ये ३० ऑगस्टला अदानी तिरुवनंतपुरम रॉयल्स विरुद्ध कालीकट ग्लोबस्टार्स यांच्यात सामना रंगला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना कालीकट संघानं १८ षटकांच्या खेळानंतर ६ विकेट्सच्या मोबदल्यात ११५ धावा केल्या होत्या. यावेळी सलमान  निजार १३ चेंडूचा सामना करून १६ धावांवर खेळत होता. यादरम्यान त्याचे स्ट्राइक रेटन १२३ एवढे होते. अखेरच्या दोन षटकात त्याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत तुफान फटकेबाजी करत अदानी तिरुवनंतपुरम रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. 

कोण घेणार द्रविडची जागा? कोचच्या शर्यतीत असलेल्या ५ चर्चित चेहऱ्यांमध्ये २ भारतीय

अखेरच्या दोन षटकात ५०० प्लस स्ट्राइक रेटसह कुटल्या धावा

१९ व्या षटकात सलामन निजार याने गियर बदलून बासिल थम्पीच्या गोलंदाजीवर आक्रमक अंदाजात फटकेबाजी केली. या षटकात त्याच्या भात्यातून सलग पाच षटकार पाहायला मिळाले. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत अभिजीत प्रवीणच्या षटकात त्याने ६ षटकार मारण्याचा डाव साधला. अखेरच्या १२ चेंडूत त्याने ५३८.४ च्या स्ट्राइक रेटसह ७० धावा कुटल्या. 

 सोशल मीडिया तुफान फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायरल

सलमान निजार याने केलेल्या २६ चेंडूतील ८६ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर  कालीकट ग्लोबस्टार्स संघाने निर्धारित २० षटकात  ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. फक्त षटकारांची डील करणाऱ्या सलमानच्या  भात्यातून एकही चौकार आला नाही.  त्याने केलेल्या वादळी खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटकेरळ