Join us
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Boycott India Match: पाकिस्तानची नवी 'नौटंकी', मोहसिन नक्वींचे नाव घेत सलमानचं मोठं वक्तव्य

PCB ची नवी चाल, सरकारच्या साथीनं खेळला सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:41 IST

Open in App

IND vs PAK,  Salman Agha Big Statement After Pakistan Boycott Match vs India : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास 'राजी' असल्याचे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवी चाल खेळली आहे. स्पर्धेत सहभागी होणार, पण भारतीय संघाविरुद्ध खेळणार नाही, अशी अधिकृत भूमिका शेजाऱ्यांनी घेतलीये. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरकारला पुढे करत भावकीसाठी अर्थात बांगलादेशला समर्थन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. हा मुद्दा चांगलाच तापला असून यावर पाकिस्तानी टी-२० संघाचा कर्णधार सलमान आगाचं वक्तव्यही चर्चेत आले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

PCB ची नवी चाल, सरकारच्या साथीनं खेळला सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा डाव

पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारी रोजी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देत पाकिस्तानचा विश्वचषकातील सहभाग अनिश्चित मानला जात होता. मात्र अधिकृत निवेदन जारी करत पाकिस्तानने स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. पण १५ फेब्रुवारीला भारताविरुद्ध होणारा सामना न खेळण्याचा निर्णय घेत त्यांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान आगा याने मोठे वक्तव्य केले आहे.

IND vs PAK: पाकिस्तानच्या निर्णयामुळे ICCचा संताप, 'या' पाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता

सलमान आगा काय म्हणाला?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाकिस्तान संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली. तिसरा आणि अखेरच्या टी-२० सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ११२ धावांनी विजय नोंदवत मालिका खिशात घातली. या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभाग आणि भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार यासंदर्भातील मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सलमान आगा म्हणाला की, "आम्ही वर्ल्ड कप खेळायला जाणार आहोत. हा निर्णय आमचा नाही; आम्ही काही करू शकत नाही. सरकार किंवा पीसीबीचे अध्यक्ष जे सांगतील, तेच आम्ही करू." 

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासह ‘अ’ गटात पाकिस्तान

७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या १० हंगामाला सुरुवात होणारआहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत भारत, नामीबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्यासह 'अ' गटात आहे. पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. पाकिस्तानचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानने आजवर फक्त एकदाच (२००९) टी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांना साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Boycott Drama: Salman's Statement on India Match Controversy

Web Summary : Pakistan may boycott India match in T20 World Cup, citing government's decision. Salman Agha says team will follow PCB's direction. Pakistan is in Group A with India.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीबीसीसीआय