चेन्नई सुपर किंग्सने सराव शिबीर रद्द केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून रांचीत दाखल झाला. कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३ व्या मोसमाचे आयोजन अधांतरी पडले आहे. २९ मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलमधील सर्व फ्रँचायझींनी आपापले सराव शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि खेळाडूंना त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. महेंद्रसिंग धोनीही रांचीत परतला, पण घरी परतताच पत्नी साक्षीनं त्याची शाळा घेतली.
रांचीत पोहोचताच धोनीनं बाईक राईड केली आणि चाहत्यांसोबत सेल्फीही काढला. आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर धोनीने आपला लुक बदलला आणि फ्रेंचकट दाढी ठेवली आहे. रांचीच्या रस्त्यांवर धोनीनं रस्त्यांवर बाईक राईड केली. कोरोना व्हायरसमुळे सर्वांना काळजी घेण्यास सांगितले आहे, परंतु धोनी बिनधास्त बाईक राईड करताना दिसला, शिवाय त्यानं चाहत्यांसोबत सेल्फीही काढली. पण, साक्षीनं घरी परतलेल्या धोनीला सज्जड दम भरलेला पाहायला मिळाले.
ऐटीत बाईक राईड करून घरी परतलेल्या धोनीनं चुकीच्या ठिकाणी पार्किंग केले. त्यावरून साक्षीनं धोनीला बाईक योग्य ठिकाणी पार्क करण्यास सांगितले.
![]()
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जवळपास ९ महिने धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलमधील कामगिरीवर त्याचे टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी
शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!
Shocking : २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा Corona Virusमुळे मृत्यू, क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी
स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना Corona Virusची लागण
Corona Virusच्या भीतीनं जग थांबलंय अन् इंग्लंडची क्रिकेटपटू भटकंती करतेय
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट