CoronaVirus: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पण, याच्या दसपट कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:10 PM2020-03-17T13:10:21+5:302020-03-17T13:11:15+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus: Cricket Australia hopes to host Men's T20 World Cup 2020 as scheduled svg | CoronaVirus: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

CoronaVirus: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पण, याच्या दसपट कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे जणू जग एक पाऊल मागे गेले आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विरुद्ध इंग्लंड,  बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आदी क्रिकेट मालिका रद्द झाल्या आहेत. शिवाय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2020) स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं शेफिल्ड शिल्ड स्पर्धाही रद्द करून न्यू साऊथ वेल्स संघाला जेतेपद जाहीर केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं परिस्थिती लवकरच सुधरेल असे सांगताना ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये होणारा वर्ल्ड कप नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. सीरि ए, इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, बुंदेसलिगा आदी फुटबॉल लीग रद्द करण्यात आल्या आहेत. युरोपमधील विविध क्लबच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. त्यात स्पॅनिश फुटबॉल क्लब व्हॅलेंसियानं त्यांच्या क्लबमधील ३५ टक्के साहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी केव्हीन रॉबर्ट म्हणाले की, १५ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात मोठ्या संख्येनं लोकं उपस्थित राहून जगाला प्रेरणादायी संदेश देतील. येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात सर्व क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. अशी परिस्थिती उद्भवेल, असं कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे ती लवकर सुधरेल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होईल.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

Shocking : २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा Corona Virusमुळे मृत्यू, क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी

स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना Corona Virusची लागण

Corona Virusच्या भीतीनं जग थांबलंय अन् इंग्लंडची क्रिकेटपटू भटकंती करतेय

Web Title: Corona Virus: Cricket Australia hopes to host Men's T20 World Cup 2020 as scheduled svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.