Mumbai Indians Vs Delhi Capitals WPL 2024: यष्टिरक्षक-फलंदाज यास्तिका भाटिया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकासह सजीवन सजनाने मारलेल्या निर्णायक षटकाराच्या जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएलमध्ये विजयी सलामी देताना दिल्ली कॅपिटल्सला ४ बळींनी नमवले.
दिल्लीने २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्यानंतर मुंबईने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. यास्तिकाने ४५ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ५७, तर हरमनप्रीतने ३४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५५ धावांची खेळी केली. मुंबईला २ चेंडूंत ५ धावांची गरज असताना हरमनप्रीत बाद झाली. यानंतर अखेरच्या चेंडूवर सजनाने निर्णायक षटकार मारत दिल्लीच्या हातून सामना खेचून घेतला.
मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकांत विजयासाठी १२ धावा हव्या होत्या. शेवटच्या षटकांत नेमकं काय घडलं?, पाहा
१९.१: पूजा वस्त्राकर बाद
१९.२ : २ धावा (अमनजोत कौर)
१९.३ : १ धाव (अमनजोत कौर)
१९.४ : ४ धावा, चौकार (हरमनप्रीत कौर)
१९.५ : हरमनप्रीत कौर बाद
१९.६ : ६, षटकार (सजीवन सजना)
पाहा व्हिडीओ-
बॉलिवूड जलवा
डब्ल्यूपीएलच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड जलवा पाहण्यास मिळाला. यावेळी 'किंग खान' शाहरूख खान याच्यासह शाहीद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि वरुण धवन यांनी सोहळ्यामध्ये रंगत आणली. कार्तिक आर्यनने सर्वप्रथम आपले नृत्य सादर केले. त्याने यावेळी गुजरात जायंट्स सघाला आपला पाठिबाही दर्शविला. त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने दिल्ली कॅपिटल्ससाठी, टायगर श्रॉफने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी, वरुण धवनने यूपी वॉरियर्ससाठी आणि शाहीद कपूरने मुंबई इंडियन्ससाठी सादरीकरण केले. सर्वांत शेवटी शाहरूखच्या सादरीकरणाने सोहळ्यात रंगत आली. त्याच्या सादरीकरणाने संपूर्ण एम. चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून गेले.