ICC T2o World Cup 2026, Pakistan vs Namibia, 35th Match टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ मधील स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत पाकिस्तानच्या संघाने साहिबजादा फरहानच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर नामिबियासमोर २०० धावांचे टार्गेट सेट केले आहे. साहिबजादा याने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या टी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या खेळीसह तो यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. एवढेच नव्हे तर यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीतही तो नंबर वन आहे. साहिबजादाच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १९९ धावा काढल्या.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एका बाजूला साहिबजादा फरहान याच्या शतकाची चर्चा रंगत असताना बाबर आझमला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन बॅटिंगला का नाही पाठवलं? हा मुद्दाही चर्चेचा ठरतोय. प्लेइंग इलेव्हन घेऊन तीन विकेट्स पडल्यावरही तो बॅटिंगला आला नाही. ही गोष्ट पाक संघाला त्याच्यावर भरवसा नाही हे दाखवणारीच होती. नामिबियाविरुद्ध जर स्टार बॅटरला बॅटिंगला पाठवायचे नसेल तर त्याला संघात असण्यालाही अर्थ उरत नाही. त्यामुळे बाबरची पाकिस्तानच्या संघात किंमतच उरली नाही का? असा प्रश्न निर्माण होता.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना साहिबजादा फरहान आणि सईम अयूब जोडीनं पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. १२ चेंडूत १४ धावा करून सईम अयूब माघारी फिरला. त्याच्या जागी फलंदाजीला आलेल्या पाक कर्णधार सलमान अली आगानं २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. कर्णधाराची विकेट पडल्यावर बाबर आझम फलंदाजीला येणं अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. ख्वाजा नाफयला संधी मिळाली. एवढेच नाही तो ५ धावांवर परतल्यावर शादाब खान फलंदाजीला आला. त्याने २१ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या धावफलकावर १९९ धावा लावल्या. दुसऱ्या बाजूला साहिबजादाने ५७ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०० धावांची नाबाद खेळी केली. बाबर आझम हा टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. पण सध्या तो धावांसाठी संघर्ष करताना दिसते. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन बॅटिंगला न पाठवत त्याचा इज्जतीचा फालुदा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Web Summary : Sahibzada Farhan's unbeaten century powered Pakistan to a 199-run target against Namibia in the T20 World Cup. Questions arise as Babar Azam didn't bat, sparking debate about his role in the team.
Web Summary : साहिबजादा फरहान के नाबाद शतक से पाकिस्तान ने नामीबिया के खिलाफ टी20 विश्व कप में 199 रनों का लक्ष्य रखा। बाबर आज़म के बल्लेबाजी न करने से सवाल उठे, टीम में उनकी भूमिका पर बहस छिड़ी।