Harmanpreet Kaur On Sachin Tendulkar : भारतीय महिला संघाला पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिलेल्या मोलाचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरला. खुद्द भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं यासंदर्भातील खास गोष्ट शेअर केली आहे. नवी मुंबईच्या मैदानात मिळवलेला ऐतिहासिक विजय अजूनही हरमनप्रीत कौरला स्वप्नवत वाटतो. १६ वर्षांच्या कारकिर्दीनंतर अचानक सगळं काही बदलल्याचा अनुभव घेत आहे, असेही ती म्हणाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनल आधी क्रिकेटच्या देवाचा कॉल, हरमनप्रीत कौरनं शेअर केली खास गोष्ट
विश्व कप फायनलच्या आधी भारताचा महान फलंदाज आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने दिलेला सल्ला सर्वात महत्त्वाचा ठरला, असे हरमनप्रीत कौर म्हणाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री महिला टीमच्या कर्णधार हरमनप्रीतला सचिन तेंडुलकर याने कॉल करुन मोलाचा सल्ला दिला होता.
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काय दिला होता सल्ला?
हरमनप्रीत कौरनं ICC रिव्ह्यूमध्ये सांगितले की, अंतिम सामन्याच्या आदल्या रात्री सचिन सरांचा फोन आला. संघातील सर्व खेळाडूंसोबत त्यांनी आपला अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी आम्हाला संतुलन राखण्याचा सल्ला दिला. जेव्हा सामना वेगाने सुरू असेल तेव्हा थांबून खेळण्याचा प्रयत्न करा, कारण जर तुम्ही देखील वेगाने खेळलात तर चूक होऊ शकते, असे त्यांनी सांगितल्याचा खास किस्सा हरमनप्रीत कौरनं शेअर केला.
आई-वडिलांसमोर विश्वविजेतेपद जिंकण अधिक खास
हरमनप्रीतने पुढे म्हणाली की, नवी मुंबईच्या मैदानात माझे आई वडील मैदानात उपस्थितीत होते. त्यांच्या समोर विश्व कप जिंकण्याचा क्षण अधिक खास होता. कारण ते लहानपणापासून मला हेच सांगत आले होते की, भारताची जर्सी घालून देशासाठी खेळायचे आहे, कर्णधार व्हायचे आहे आणि विश्व कप जिंकायचा आहे.
क्रिकेटच्या देवामुळे बहरली होती शफालीची मॅच इनिंग खेळी
महिला विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातही मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर मैदानात उपस्थितीत होता. याशिवाय भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानंही फायनल लढतीसाठी मैदानात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. फायनलमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मारणाऱ्या शफाली वर्मानं बॅटिंगसह बॉलिंगमध्ये धमक दाखवली होती. सचिन तेंडुलकर मैदानात असल्यामुळे खेळी बहरण्याची ताकद मिळाली, ही गोष्ट तिने बोलून दाखवली होती. त्यानंतर आता कर्णधार हमरनप्रीत कौरनं सचिन तेंडुलकरचा सल्ला विश्वविजेता होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी मोलाचा ठरला असे म्हटले आहे.