लेकाचा वाढदिवस अन् कन्या दिन! 'बापमाणूस' सचिनची मुलगी सारा आणि अर्जुनसाठी खास पोस्ट

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर दिग्गज अशा विविध नावांनी ओळखला जाणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 14:58 IST2023-09-24T14:57:51+5:302023-09-24T14:58:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
 Sachin Tendulkar shared a childhood photo of his daughter Sara Tendulkar and Arjun Tendulkar on the occasion of daughter's birthday and Daughters Day  | लेकाचा वाढदिवस अन् कन्या दिन! 'बापमाणूस' सचिनची मुलगी सारा आणि अर्जुनसाठी खास पोस्ट

लेकाचा वाढदिवस अन् कन्या दिन! 'बापमाणूस' सचिनची मुलगी सारा आणि अर्जुनसाठी खास पोस्ट

Happy Birthday Arjun Tendulkar । मुंबई : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर दिग्गज अशा विविध नावांनी ओळखला जाणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या सचिनने आपल्या लेकाच्या वाढदिवशी एक खास पोस्ट केली आहे. खरं तर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. याशिवाय आज सर्वत्र कन्या दिन साजरा केला जात आहे. अशातच 'क्रिकेटच्या देवा'ने हा योगायोग सांगत लेक अन् आपल्या लेकासाठी एक खास पोस्ट केली.

कन्या दिवस आणि लेकाच्या वाढदिवसानिमित्त सचिनने सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये त्याने म्हटले, "किती सुंदर योगायोग... अर्जुनचा वाढदिवस आणि कन्या दिन एकाच दिवशी साजरा करत आहे."

आज अर्जुन तेंडुलकरचा २४वा वाढदिवस आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप मेहनत घेत आहे. आयपीएलच्या मागील हंगामातून त्याने जगातील सर्वात मोठ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये पदार्पण केले. जगभरातील क्रिकेटपटू सचिनच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुनला शुभेच्छा दिल्या. "लहान मुलापासून ते एका चांगल्या तरुणापर्यंत, तुला मोठे होणे आणि महान गोष्टी साध्य करताना पाहूण चांगले वाटते", असे युवीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहले. 

Web Title:  Sachin Tendulkar shared a childhood photo of his daughter Sara Tendulkar and Arjun Tendulkar on the occasion of daughter's birthday and Daughters Day