Join us

Twitter Blue : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, MS Dhoni, विराट कोहली यांचे ट्विटरने 'Blue Tick' हटवले; जाणून घ्या नेमकं काय झाले

ट्विटरने २० एप्रिलच्या मध्यरात्री अचानक काही सेलिब्रेटी आणि संस्थांना दिलेले ब्लू टिक ( Blue Tick) हटवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 00:48 IST

Open in App

ट्विटरने २० एप्रिलच्या मध्यरात्री अचानक काही सेलिब्रेटी आणि संस्थांना दिलेले ब्लू टिक ( Blue Tick) हटवले. यामध्ये अनेक सेलिब्रेटी आहेत आणि भारतीय क्रिकेट वर्तुळाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास महान फलंदाज सचिन तेंडुलकर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सध्याचा कर्णधार रोहित शर्मा व स्टार फलंदाज विराट कोहली यांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरून या चार दिग्गजांच्या ब्लू टिक अचानक गायब झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्लू टिकसाठी ज्यांनी पैसे मोजले आहेत  त्यांच्याच प्रोफाईलवर ब्लू टिक कायम राहणार असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.  

त्यामुळे आतापर्यंत ब्लू टिकसाठी मिळणारी मोफत सुविधा बंद करण्यात आली आहे. आता या सर्वांना ब्लू टिकसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ब्लू टिकसाठीचे पैसे विभागानुसार वेगवेगळे आहेत. अमेरिकेत iOS किंवा Android युझर्ससाठी महिन्याला ११ डॉलर आमइ वर्षाला ११४.९९ डॉलर मोजावे लागणआर आहेत. तेच वेब युझर्ससाठी महिन्याला ८ आणि वर्षाला ८४ डॉलर मोजावे लागतील. भारताच्या बाबतित सांगायचे तर iOS साठी महिन्याला ९०० रुपये, वेबसाठी ६५० रुपये मोजावे लागतील. तेच वर्षाला iOSसाठी ९४०० आणि Android युझर्ससाठी महिन्याला ९०० व वर्षाला ९४०० रुपये मोजावे लागणार आहेत. ट्विटरने आता ब्लू टिकसाठी काय करावे याची नियमावलीही सांगितली आहे.    ''Verified Organizations हा संस्था आणि त्यांच्या संलग्नांसाठी Twitter वर स्वतःला वेगळे ठेवण्याचा एक नवीन मार्ग आहे. Verified साठी Twitter वर अवलंबून राहण्याऐवजी ज्या खात्यांची पडताळणी केली जावी, त्या सत्यापित संस्थांसाठी साइन अप करणार्‍याची सुविधा आहे आणि त्यांना त्यांच्याशी संलग्न असलेल्या खात्यांची स्वतः तपासणी आणि पडताळणी करता येणार आहे. संस्थेशी संलग्न असलेल्या खात्यांना त्यांच्या प्रोफाईलवर संस्थेच्या लोगोसह संलग्न बॅज मिळेल आणि ते संस्थेच्या Twitter प्रोफाइलवर वैशिष्ट्यीकृत केले जातील, त्यांची संलग्नता दर्शवेल. सर्व संस्था सत्यापित संस्थांमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाते,''

टॅग्स :ट्विटरसचिन तेंडुलकररोहित शर्माविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी
Open in App