नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन गुरुंचे स्मरण करीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. तेंडुलकरने लिहिले की, ‘गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला सर्वोत्तम करण्यासाठी प्रेरित करणाºया या सर्वांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम माझा भाऊ ज्याने मला (रमाकांत) आचरेकर सरांकडे नेले. फलंदाजी करताना तो माझ्यासोबत नसला तरी मानसिक रुपाने तो सदैव माझ्यासोबत असायचा. आचरेकर सरांनी माझ्या फलंदाजीवर बराच वेळ खर्ची घातला. त्याचप्रमाणे मी माझ्या वडिलांचा आभारी आहे. त्यांनी मला नेहमी कधीच मूल्यांसोबत तडजोड न करण्याची शिकवण दिली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण
सचिन तेंडुलकरने केले गुरूंचे स्मरण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तीन गुरुंचे स्मरण करीत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 02:34 IST