Sachin Tendulkar Only Indian To This In Asia Cup : क्रिकेटच्या मैदानातील २४ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अनेक विक्रम नोंदवले आहेत. बॅटिंगच्या बाबतीत त्याला आजही तोड नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आशिया कप स्पर्धेत बॅटिंगसह बॉलिंगमधील खास कामगिरीच्या जोरावर सचिन तेंडुलकरच्या नावे एक खास रेकॉर्ड आहे. अन्य कोणताही भारतीय या स्पर्धेत सचिनसारखी अष्टपैलू कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळेच सचिन हा या स्पर्धेत भारताचा नंबर वन ऑलराउंटर ठरतो. याशिवाय श्रीलंकन जयसूर्याच्या गोष्ट तर आणखी भारी आहे. इथं जाणून घेऊयात आशिया कपमधील या दोन दिग्गजांच्या खास रेकॉर्डसंदर्भातील स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारताकडून फक्त सचिन तेंडुलकरनं साधलाय हा डाव
सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत आशिया कप स्पर्धेतील २३ सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनीधीत्व केले आहे. यातील २१ डावात त्याने ९७१ धावा केल्या आहेत. याशिवाय १५ डावात गोलंदाजी करताना तेंडुलकरनं १७ विकेट्स घेतल्या आहेत. यात २१ धावा खर्च करत ३ विकेट्स ही सचिन तेंडुलकरची आशिया कप स्पर्धेतील गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर हा सनथ जयसूर्या (१२२०) आणि कुमार संगकारा (१०७५) याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून या स्पर्धेत ५०० पेक्षा अधिक धावा अन् १५ विकेट्स घेणारा तो एकमेवर खेळाडू आहे. ही आकडेवारी त्याला आशिया कप स्पर्धेतील भारताचा नंबर वन ऑलराउंडर ठरवते.
टीम इंडियाकडून प्रमुख ऑलराउंडरच्या रुपात खेळताना रवींद्र जडेजा (२५) आणि इरफान पठाण (२२) यांनी भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्यात. पण धावांचा विचार करता जड्डू २० सामन्यातील ११ डावात १८२ धावा आणि इरफान पठाणच्या खात्यात १२ सामन्यातील ७ डावात १०७ धावांची नोंद आहे.
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
जयसूर्या तर सगळ्यात भारी!
१९९० ते २००८ या कालावधीत २५ सामन्यातील २४ डावात जयसूर्यानं या स्पर्देत १२२० धावा कुटल्या आहेत. एवढेच नाही तर गोलंदाजाच्या रुपात संघासाठी उपयुक्त कामगिरी नोंदवताना २१ डावात त्याने २२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. ४९ धावांत ४ विकेट्स ही जयसूर्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. आशिया कप स्पर्धेत १००० पेक्षा अधिक धावा अन् २० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. आशिया कप स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी अष्टपैलू ठरतो.