Sachin Tendulkar On Rishabh Pant : रिषभ पंत आपल्या स्फोटक शैलीतील फलंदाजीसाठी ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्येही तो अनेकदा उलटे सुलटे फटके मारत धावा करण्यावर भर देतो. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत रिव्हर्स स्वीप खेळणं त्याला चांगलेच महागात पडल्याचेही पाहायला मिळाले. क्रिस वोक्सचा चेंडू लागल्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला अन् जवळपास ६ आठवड्यांपर्यंत त्याच्यावर क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ आलीये. या दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकल्यावर आशिया कप स्पर्धेतही टीम इंडियाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत सिग्नेचर शॉट अन् खेळताना पडतो, म्हणजे फलंदाजीत अभाव?
उलटा सुलटा फटका मारण्याच्या नादात अनेकदा पंतनं विकेटही गमावलीये. शॉट सिलेक्शनमुळे त्याच्यावर ट्रोल होण्याची वेळही आलीये. पण त्याने आपली खासियत दाखवणारी फटकेबाजीत तडजोड केली नाही. रिव्हर्स स्वीप आणि स्कूप शॉट खेळताना तो अगदी जमिनीवर झोपून फटका मारताना पाहायला मिळते. हा फटका मारताना तो एकदा दोनदा नाही तर सातत्याने पडतो. ही गोष्ट पंत फलंदाजीत तांत्रिकृष्ट्या कमकुवत असल्याचे संकेत देणारी आहे का? असा प्रश्न काहींना पडू शकतो. त्यावर आता खुद्द क्रिकेटच्या देवानं अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भाष्य केले आहे.
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
तेंडुलकरकडून पंतचं कौतुक
इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरीचा दाखला देत मास्टर सचिन तेंडुलकरनंरिषभ पंतच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे. आक्रमक शैलीत खेळणारा पंत आता कसोटीसाठीही परिपक्व झालाय, असे सांगत तेंडुलकरनं पॅडल स्वीप मारताना पंत का पडतो? त्यामागंच कारणही सांगितले आहे.
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! पंतसंदर्भात नेमकं काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
तेंडुलकरनं पंतच्या सिग्नेचर शॉटसंदर्भात म्हटलंय की, "पंत ज्यावेळी स्वीप शॉट खेळतो, त्यावेळी तो चेंडू खाली येऊन स्कूप करतो. लोकांना वाटतं की, फटका मारताना तो पडलाय. पण ही गोष्ट पंत जाणीवपूर्वक करतो. फटका एकदम उत्तमरित्या मारण्यासाठी योजनाबद्ध प्लॅनचा तो एक भाग असतो, अशा आशयाच्या शब्दांत तेंडुलकरनं भारतीय विकेट किपर बॅटर पडतो ते 'स्क्रिप्टटेड' असल्याचे म्हणजेच ठरवून केलेली कृती असते, अशी खास गोष्ट शेअर केली आहे.