IMLT20 Final : सचिन विरुद्ध लारा यांच्यात सामना! कधी अन् कुठं रंगणार फायनल? जाणून घ्या सविस्तर

भारतीय संघानं कांगारूंची शिकार करत तर वेस्ट इंडिजने लकेंसमोर डंका दाखवून देत गाठलीये फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 09:50 IST2025-03-15T09:41:44+5:302025-03-15T09:50:40+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar Lead India Masters vs Brian Lara West Indies Masters Final International Masters League T20 2025When and where will Play This Match Know the details | IMLT20 Final : सचिन विरुद्ध लारा यांच्यात सामना! कधी अन् कुठं रंगणार फायनल? जाणून घ्या सविस्तर

IMLT20 Final : सचिन विरुद्ध लारा यांच्यात सामना! कधी अन् कुठं रंगणार फायनल? जाणून घ्या सविस्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Masters vs West Indies Masters, Final : क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विरुद्ध ब्रायन लारा असा फायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल मास्टर्स लीग टी-२० (International Masters League T20) स्पर्धेतील २०२५ च्या हंगामात पहिल्या सेमी फायनलमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्स संघानं ऑस्ट्रेलियाचा ९४ धावांनी धुव्वा उडवत फायनल गाठली. या सामन्यात सचिनसह युवराज सिंगचा जलवा पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज मास्टर्स संघानं श्रीलंकेला पराभूत करत फायनल गाठली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 'ओल्ड इज गोल्ड'  या सहा संघातील दिग्गजांनी स्पर्धेत भरला रंग, आता फायनल 'जंग'

इंटर नॅशनल मास्टर्स लीग टी-२० स्पर्धेत दिग्गज क्रिकेटर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. इंड़िया मास्टर्स आणि वेस्ट इंडिज मास्टर्स या फायनलिस्टशिवाय ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड असे एकूण ६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा खेळ साखळी फेरीत खल्लास झाला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. आता इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यात जेतेपदाची लढाई पाहायला मिळाले. क्रिकेट चाहत्यांना तेंडुलकर वर्सेस लारा यांच्यात पुन्हा एकदा आमना सामना पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. 

 इंडिया मास्टर्सचे पारडं जड; कारण...

फायनल आधी या टी-२० लीग स्पर्धेतील साखळी फेरीत इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टार्स यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीयसंघानं सौरभ तिवारी आणि रायडूच्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर  ही लढाई २५० पार धावसंख्येची केली आणि ती ७ धावांनी जिंकली होती. याशिवाय साखळी फेरीत वेस्ट इंडिज मास्टर्सच्या तुलनेत इंडिया मास्टर्स संघाची कामगिरी दमदार राहिली. त्यामुळेच फायनमध्ये भारतीय संघाचे पारडे अधिक जड दिसते.

कधी अन् कुठं रंगणार फायनल सामना?

इंडिया मास्टर्स विरुद्ध वेस्ट इंडिज मास्टर्स यांच्यातील अंतिम सामना हा रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रविवारी १६ मार्चला सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या सामन्यााल सुरुवात होईल. याआधी या दोन संघात लढत झाली त्यावेळी वेस्ट इंडिजच्या ताफ्यात लारा दिसला. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची झलक पाहायला मिळाली नव्हती. यावेळी फायनलमध्ये दोघे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळू शकते.

Web Title: Sachin Tendulkar Lead India Masters vs Brian Lara West Indies Masters Final International Masters League T20 2025When and where will Play This Match Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.