नवी मुंबई: विराट कोहलीसचिन तेंडुलकरच्या विक्रमांना एकापाठोपाठ एक अशी गवसणी घालत आहे. यावर खुद्द सचिन आश्चर्यचकित झाला. कोहलीला सचिनने महान खेळाडूंपैकी एक असे संबोधलेच शिवाय तुलना करण्यावर आपला विश्वास नसल्याचेही स्पष्ट केले. कोहलीने नकताच सचिनचा विक्रम मोडित काढून एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान दहा हजार धावा नोंदविण्याचा विश्वविक्रम केला. आता सचिनच्या विक्रमी ४९ शतकांचा पाठलाग करण्यात व्यस्त असलेल्या विराटने विंडीजविरुद्धच्या मालिकेत तिसरे आणि एकूण ३८ वे शतक गाठले.यावर सचिन म्हणाला,‘खेळाडू म्हणून विराट वेगाने प्रगती करीत आहे, त्याच्यात काही करण्याची क्षमता असल्याने मला सुरुवातीपासूनच अव्वल फलंदाजांमध्ये तो स्थान मिळवेल, असे वाटत होते. तो या शतकातील नव्हे तर सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक ठरतो. कोहलीला सर्वकालीन महान फलंदाज ठरविणे प्रत्येकाचा वेगळा विचार असू शकतो. मी कुणाशीही तुलना करणार नाही. ६० ते ८० च्या दशकात वेगळ्या प्रकारचे गोलंदाज होते. मी खेळायचो तेव्हा आणि सध्याच्या गोलंदाजीत फरक आहे.’डीवाय पाटील अकादमीत मिडलसेक्स ग्लोबल अकादमीच्या शिबिरात सचिन आणि त्याचा बालपणचा मित्र विनोद कांबळी यांनी खेळाडूंना टीप्स दिल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक ठोकणाऱ्या सचिनने मी कुणाची तुलना करण्यावर विश्वास बाळगत नसल्याचे सांगितले. प्रत्येक कालावधीत खेळाचे स्वरूप बदलत असते, असे स्पष्ट करीत सचिनने कसोटी कारकीर्द सुरू करणाºया पृथ्वी शॉ चेही कौतुक केले. पृथ्वीने प्रत्येक प्रकारात चांगली कामगिरी केली असून त्याचे वय पाहता सुधारणेस बराच वाव असल्याचे सचिनने सांगितले. त्याचप्रमाणे सचिनने यावेळी युवा वेगवान गोलंदाज खलील अहमद याचेही कौतुक केले. ‘आतापर्यंत जेव्हा जेव्हा खलीलला पाहिले आहे, तेव्हा त्याच्या खेळात सुधारण झालेली पाहिली,’ असे सचिनने म्हटले.भारताला वर्चस्वाची संधी‘आगामी आॅस्ट्रेलिया दौºयात माझ्यामते भारताकडे वर्चस्व गाजवण्याची खूप मोठी संधी आहे. नक्कीच विद्यमान आॅस्टेÑलिया संघ पूर्वीप्रमाणे मजबूत दिसत नाही. या संघात आता स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचा समावेशही नाही. त्यामुळे भारताकडे तेथे सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी आहे,’ असे सचिनने यावेळी म्हटले.स्मिथ व वॉर्नर यांना पुन्हा क्रिकेट खेळताना पाहण्याची इच्छा आहे का, यावर सचिन म्हणाला की, ‘नक्कीच मी आॅस्टेÑलियात चांगले क्रिकेट पाहू इच्छितो. स्मिथ व वॉर्नर दोघेही जागतिक स्तराचे खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांवरील बंदी उठवावी की नाही या वादामध्ये मला पडायचे नाही.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराटसोबतच्या तुलनेवर सचिन म्हणतो...
विराटसोबतच्या तुलनेवर सचिन म्हणतो...
विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या विक्रमांना एकापाठोपाठ एक अशी गवसणी घालत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:52 IST