दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघानं फायनल बाजी मारत पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. MI केपटाउनच्या संघासमोर काव्या मारनच्या दोन वेळच्या चॅम्पियन संघाचा 'सूर्यास्त' झाल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या दोन हंगामात जेतेपद पटकवल्यानंतर काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स ईस्टर्न संघाला जेतेपदाची हॅटट्रिक साधण्याची संधी होती. पण मुबई फ्रँचायझीसमोर त्यांचा हा डाव फसला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्स केप टाउन संघानं सनरायझर्स ईस्टर्न संघाला ७६ धावांनी मात देत पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कगिसो रबाडा अन् ट्रेंड बोल्टचा जलवा
फायनल लढतीत मुंबई इंडियन्स केपटाउन संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सनरायझर्सच्या संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १० धावांत संघाने दोन विकेट्स गमावल्या. मुंबई फ्रँचायझी संघाकडून कगिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांनी भेदक मारा करत सनरायझर्स संघाला १८.४ षटकात १०५ धावांत आटोपलं.
बॅटिंग अन् बॉलिंग दोन्ही क्षेत्रात MI चा दबदबा
एसए टी२० लीगमधील फायनल लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघानं बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात धमाकेदार कामगिरी केली. पहिल्यांदा बॅटिंग करताना MI च्या ताफ्यातील डेवाल्ड ब्रेविस याने १८ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कॉनर एस्टरहुइजन याने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीला तुफान फटकेबाजी करताना विकेटकिपर बॅटर रिकेल्टन याने १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. मुंबई इंडियन्स केपटाउन संघानं अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर MI केपटाउन संघानं सनरायझर्स संघासमोर १८२ धावांचे टार्गेट सेट केले होते.
रबाडाचा 'चौकार'
दोन वेळचा चॅम्पियन संघ हे आव्हान सहज पार करेल, असे वाटत होते. पण, MI केपटाउनच्या ताफ्यातील गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संघ गडबडला, ३.४ षटकात अवघ्या २६ धावांत संघाने ४ विकेट्स गमावल्या. संघाकडून रबाडानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्टनं आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी १-१ तर कॅप्टन राशिद खान आणि कॉर्बिन बॉस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Web Title: SA20 MI Cape Town end Kavya Maran Owner Sunrisers Eastern Cape’s reign clinch first title in third season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.