Join us

Video: सुपर कॅच! हवेत उडी मारत एका हाताने मार्करमने घेतला भन्नाट झेल; फलंदाजही अवाक्

SA20: चेंडू डोक्यावरून निघून जाईल वाटत असतानाच मार्करमने हवेत उडी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 09:39 IST

Open in App

Aiden Markram Catch Video, SEC vs DSG, SA20: साऊथ आफ्रिका टी२० लीग म्हणजेच SA T20 लीग स्पर्धेमध्ये मंगळवारी सनरायजर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सामना झाला. सामन्यात सनरायजर्स संघाने ५१ धावांनी विजय मिळवला. सनरायजर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मलानने केलेल्या ६३ धावांच्या बळावर १५७ धावा केल्या. डर्बन संघाकडून आव्हानाचा पाठलाग करताना विआन मुल्डरने सर्वाधिक ३८ धावा केल्या पण त्यांना एकूण १०६ धावाच करता आल्या. या सामन्यात सनरायजर्सचा कर्णधार एडन मार्करमच्या कॅचची प्रचंड चर्चा रंगली.

सामन्याच्या चौथ्या षटकात बार्टमन गोलंदाजी करत होता. त्याआधी डर्बन संघाने मॅथ्यू बीट्झके आणि टॉनी डी जॉर्जी यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे त्यांची अवस्था २ बाद १३ अशी होती. त्याच वेळी जेजे स्मट्स खेळायला आला. पहिल्या तीन चेंडूमध्ये त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे अखेर त्याने हवाई फटका खेळला पण चेंडू हवेत असतानाच मार्करम हवेत झेप घेतली आणि भन्नाट कॅच पकडला.

मार्करमच्या या झेलाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचा झेल पाहून खुद्द फलंदाजही अवाक् झाला. चेंडू डोक्यावरून चौकार जाईल अशी फलंदाजाची अपेक्षा  होती, पण तसे न घडला मार्करमने अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर डर्बन संघाच्या टीमला सामन्यात उभारी घेताच आली नाही. त्यांचा डाव १०६ धावांवर आटोपला आणि त्यांना ५१ धावांनी हार पत्करावी लागली. 

टॅग्स :द. आफ्रिकाटी-20 क्रिकेटसोशल व्हायरल