इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या १८ व्या हंगामाला २२ मार्च २०२५ पासून सुरुवात होत आहे. या आधी स्पर्धेत सहभागी असलेल्या १० फ्रँचायझी संघांच्या कर्णधारांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मुख्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर एकत्रित जमलेल्या सर्व कर्णधारांचे ट्रॉफीसह फोटोशूटही झाले. यावेळी प्रत्येक कर्णधाराचा रुबाब बघण्याजोगा होता. सोशल मीडियावर सर्व १० फ्रँचायझी संघातील कर्णधारांच्या खास भेटीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
ऋतुराजच्या हातात दिसली पाण्याची बाटली, त्यावरून सोशल मीडियावर व्हायरल होतीये मजेशीर मीम्स
या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची बरसात तर पाहायला मिळतेच. पण यावरून काही भन्नाट मीम्सही चर्चेत आहेत. त्यातील ऋतुराज गायकवाडच्या फोटोवरील मीम्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाउंटवरून कर्णधारांच्या मेळाव्याचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत. यातील एका फोटोत ऋतुराज हा टेबलवरील पाण्याच्या बाटलीला हात लावून उभे असल्याचे दिसून येते. यावरून काहींनी तो इतर कॅप्टनला पाण्याच्या बाटल्या देण्यासाठी होता का? असा प्रश्न उपस्थितीत करणारी मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते.
पाच संघांनी कर्णधार जुन्या कर्णधारावरच ठेवला भरवसा
सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी गत कर्णधारावरच विश्वास कायम ठेवला आहे. गत हंगामात या पाच फ्रँचायझी संघाचे नेतृत्व अनुक्रम, पॅट कमिन्स, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी केले होते. यंदाच्या हंगामातही हेच चेहरे आपापल्या संघाचे नेतृत्व करताना दिसतील.
अजिंक्य रहाणे कोपऱ्यात दिसला अन्...
अजिंक्य रहाणे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केलेल्या काही फोटोमध्ये तो कोपऱ्या कुठंतरी एकटाच दिसतोय. यावरूनही काही मीम्स तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर त्याच्या फोटोतील चेहऱ्यावर संघ मालक शाहरुख खानचा फोटो लावूनही मीम्स तयार केल्याचे दिसून येते.
पॅट कमिन्ससाठी दाक्षिणात्य चित्रपटातील सीन
यंदाच्या आयपीएल हंगामात फक्त एकच परदेशी चेहरा कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे नेतृत्व वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याच्याकडे आहे. त्याच्यासंदर्भात दाक्षिणात्य सिनेमातील सीनसह तयार करण्यात आलेली मीम्स व्हायल होताना दिसते.
यंदाच्या हंगामात उर्वरित पाच संघांच्या नेतृत्वात बदल
यंदाच्या हंगामात गत चॅम्पियन्स कोलकाता संघाने अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व दिले आहे. याशिवाय पंजाब किंग्जच्या संघानं श्रेयस अय्यरला आपला नवा कर्णधार केले आहे. रजत पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय रिषभ पंत लखनौच्या संघाचा तर अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल.