टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण बाकावर बसवलं! मग ऋतुराजनं धरला सचिननं दाखवलेला मार्ग

CSK Captain Joins Yorkshire Team: इंग्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत गेला, पण एकाही सामन्यात संधी नाही मिळाली. मग ऋतुराज गायकवाडनं मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:24 IST2025-06-10T16:22:33+5:302025-06-10T16:24:02+5:30

whatsapp join usJoin us
Ruturaj Gaikwad Follows Sachin Tendulkar's Footsteps To Play For Yorkshire | टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण बाकावर बसवलं! मग ऋतुराजनं धरला सचिननं दाखवलेला मार्ग

टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण बाकावर बसवलं! मग ऋतुराजनं धरला सचिननं दाखवलेला मार्ग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ruturaj Gaikwad Play For Yorkshire : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे माघार घेणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड  याने इंग्लंडमधील यॉर्कशायर क्रिकेट क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेकर ऋतुराज हा सचिन तेंडुलकरनंतर या क्लबकडून खेळणारा चौथा भारतीय ठरला आहे. भारतीय सलामीवीर जुलैमध्ये सरेविरुद्ध होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील सामन्याला सुरुवात होण्याआधी तो यॉर्कशायर क्लबमध्ये सामील होईल. संपूर्ण हंगामासह वनडे कपमध्येही तो संघासोबत असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऋतुराज आधी सचिनसह या खेळाडूंनी यॉर्कशायरकडून केलीये बॅटिंग  

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा इंग्लंडच्या या क्लबकडून खेळणारा पहिला परदेशी खेळाडू आहे. १९९२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी सचिन या क्लबकडून खेळला होता. याशिवाय कसोटी संघातील स्थान भक्कम करण्यासाठी युवराज सिंगनेही हा मार्ग स्विकारला होता. तोही या क्लबकडून खेळला. पण त्याला त्याचा फारसा फायदा झाला नाही. चेतेश्वर पुजाराने देखील यॉर्कशायर क्रिकेट क्लबकडून खेळताना खास छाप सोडली आहे. त्यात आता ऋतुराज गायकवाडच्या नावाचा समावेश झालाय.    

Video: ऋषभ पंतने फोडलं लॉर्ड्स स्टेडियमचं छत; गुडघ्यावर बसून ठोकला धडाकेबाज षटकार

 इंग्लंडच्या मैदानात क्रिकेटचा सर्वोत्तम अनुभव घेण्यास उत्सुक आहे ऋतुराज

 ऋतुराज गायकवाडनं एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिलीये. इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील उर्वरित सामन्यात यॉर्कशायरसोबत खेळण्यास उत्सुकआहे. या देशात क्रिकेटचा अनुभव घेणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे. इंग्लंडमध्ये यॉर्कशायर क्लब हा सर्वोत्तम संघ आहे. काउंटी चॅम्पियनशिपसह वन डे कप स्पर्धेतही संघासोबत सर्वोत्तम कामगिरी करण्याची तयार आहे, असे त्याने म्हटले आहे.

भारत 'अ' संघाकडून इंग्लंड दौऱ्यावर गेला, पण...

ऋतुराज गायकवाड इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय 'अ' संघाचा भाग आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील भारतीय 'अ' संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दोन्ही अनौपचारिक कसोटी सामने अनिर्णित राहिले. ऋतुराज गायकवाडला यातील एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर आता बाकावर बसण्याची वेळ आलेल्या ऋतुराज गायकवाडनं आता इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये  यॉर्कशायर क्लबकडून इथंल्या मैदानात खेळण्याची हौस पूर्ण करण्याचे ठरवल्याचे दिसते. 

Web Title: Ruturaj Gaikwad Follows Sachin Tendulkar's Footsteps To Play For Yorkshire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.