Join us  

RR vs KXIP Latest News : निकोलस पुरनचे Sensational क्षेत्ररक्षण, रितेश देशमुख अन् वीरूनं केलं तोंडभरून कौतुक Video

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 10:26 PM

Open in App

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगड्या संघांत चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, अवघ्या दोन धावांनी त्यांना विक्रमाने हुलकावणी दिली. फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर RRच्या निकोलस पूरननं अप्रतिम क्षेत्ररक्षण केले. रितेश देशमुख, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेकांनी त्याचं कौतुक केलं. RR vs KXIP Latest News & Live Score

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी RRच्या गोलंदाजांना अक्षरशः रडवले. 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. 17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलही पुढच्या षटकात माघारी परतला. त्यानं 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या. मयांक व लोकेश यांनी भक्कम पाया रचल्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरन व ग्लेन मॅक्सवेल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली आणि KXIPला 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा करून दिला. मॅक्सवेल 12, तर पूरन 25 धावांवर नाबाद राहिले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना RR ची सुरुवात निराशाजनक झाली. जोस बटलर लगेच माघारी परतला, पंरतु त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन यांनी फटकेबाजी केली. या दोघांची 81 धावांची भागीदारी 9व्या षटकात संपुष्टात आली. RRला 100 धावांवर दुसरा धक्का बसला तो स्टीव्ह स्मिथचा. त्यानं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. 

आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसन उत्तुंग फटका मारला, तो जवळपास षटकारच होता, परंतु निकोलस पूरनने ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं, ते पाहून रितेश देशमुखही अवाक् झाला. त्यानं सोशल मीडियावर पूरनचे कौतुक केले. KXIPचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्सनंही पूरनच्या या कामगिरीचे उभे राहून कौतुक केले.

पाहा व्हिडीओ...

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबराजस्थान रॉयल्स