Join us  

RR vs KXIP Latest News : मयांक अग्रवालचे IPLमधील पहिले शतक, मोडला 10 वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020 ) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan ...

By स्वदेश घाणेकर | Published: September 27, 2020 8:56 PM

Open in App

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) हे दोन तगडे संघ भिडत आहेत. RRकर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith)ने नाणेफेक जिंकून KXIPला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी KXIPला दमदार सुरुवात करून दिली. राहुलनं RCBविरुद्ध शतकी खेळी केली होती आणि आज मयांकनं 45 चेंडूंत शतक पूर्ण केले. IPLमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. या शतकासह KXIPनं RCBच्या आयपीएलमधील सर्वाधिक 13 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. RR vs KXIP Latest News & Live Score

किंग्स इलेव्हन पंजाबनं 'पॉवर' दाखवली, मुंबई इंडियन्सलाही सोडलं मागे

IPL 2020मधील 'Daddy Army'! DaughtersDay2020च्या निमित्तानं फ्रँचायझींनी पोस्ट केले खास फोटो

IPL 2020 ची ट्रॉफी रोज स्टेडियमवर कशी व कोण आणतं; पाहा खास Video

जयदेव उनाडकटनं टाकलेल्या तिसऱ्या षटकात मयांकने खणखणीत षटकार व चौकार खेचला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं चौथ्या षटकात जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) पाचारण केले. लोकेश राहुलनं पहिल्या तीन चेंडूंत सलग चौकार खेचून आर्चरचे स्वागत केले. या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये 60 धावा चोपल्या. यंदाच्या IPL 2020मधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली.RR vs KXIP Latest News & Live Score

रियान परागची सुपर डाईव्ह; RRसाठी अडवल्या 5 धावा, Video

KL Rahulनं मिळवला पहिला मान, 204च्या सरासरीनं चोपल्यात धावा

सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मयांकनं खणखणीत फटका मारला. तो जवळपास षटकारच होता, परंतु रियान परागनं अप्रतिमरित्या तो अडवला आणि KXIPला एका धावेवरच समाधान मानावे लागले. या दोघांनी 8 षटकांत 86 धावा चोपल्या. मयांकने खणखणीत षटकार खेचून 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या अर्धशतकी खेळीत 5 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे. मयांक एका बाजूने RRच्या गोलंदाजांची पीसे काढत असताना राहुल संयमी खेळी करत त्याला योग्य साथ देत होता. या दोघांनी पहिल्या दहा षटकांत बिनबाद 110 धावा चोपल्या. IPL2020मधील ही पहिली शतकी भागीदारी ठरली. ​​​​​​​RR vs KXIP Latest News & Live Score

लोकेश राहुलनंही 35 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. IPL 2020त दोनशे धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान लोकेश राहुलनं पटकावला. त्यानं 3 सामन्यांत 204च्या सरासरीनं दोनशे + धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध नाबाद 132 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यापाठोपाठ मयांकनेही दोनशे धावांचा पल्ला पार केला. त्यानं 101च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 15व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून मयांकनं IPLमधील पहिले शतक पूर्ण केले. 45 चेंडूंत त्यानं 98 चौकार व 7 षटकारांसह हे शतक पूर्ण केले. या खेळीसह मयांकनं 2010च्या मुरली विजयचा विक्रम मोडला. 17व्या षटकात टॉम कुरननं त्याला बाद केले. मयांकनं 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. ​​​​​​​RR vs KXIP Latest News & Live Score IPLमध्ये भारतीय खेळाडूचे जलद शतक37 चेंडू - युसूफ पठाण वि. मुंबई इंडियन्स, 201045 चेंडू - मयांक अग्रवाल वि. राजस्थान रॉयल्स, 202046 चेंडू- मुरली विजय वि. राजस्थान रॉयल्स, 201047 चेंडू - विराट कोहली वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 201648 चेंडू - वीरेंद्र सेहवाग वि. डेक्कन हैदराबाद, 2011 

टॅग्स :IPL 2020मयांक अग्रवालकिंग्स इलेव्हन पंजाबलोकेश राहुलराजस्थान रॉयल्स