Join us

१२ कोटी ५० लाख रुपयांच्या 'त्या' डीलसह RCB ची ट्रॉफी झाली फिक्स? जाणून घ्या 'चॅम्पियन'वाली स्टोरी

तुम्हाला माहितीये का? RCB ची ट्रॉफी फिक्स होण्यात एक 'लक फॅक्टर'ही दिसून येतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 05:31 IST

Open in App

Royal Challengers Bengaluru Crowned IPL 2025 : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील फायनल आधी रजत पाटीदार जे बोलला ते त्याने करून दाखवलं. आयपीएलच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यापासून RCB शी एकनिष्ट राहिलेल्या पण एकही ट्रॉफी नं जिंकलेल्या विराटचं स्वप्न रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली अखेर साकार झाले. १८ वा हंगाम १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीसाठी अविस्मरणीय ठरला. पंजाब विरुद्धच्या लढतीत आरसीबीचा संघ कुठंतरी मागे पडतोय, असेही चित्र निर्माण झाले होते. पण गोलंदाजीत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत आरसीबीची नय्या पार केली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

RCB च्या बॅटिंग-बॉलिंगमध्ये एकीचे बळ अन् लक फॅक्टरची ती डील

पंजाब किंग्ज विरुद्धच्या फायनल लढतीत मागे पडल्यावर रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd) नं श्रेयस अय्यरची महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणले. मग क्रुणाल पांड्याने आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. अखेरच्या षटकात भुवी अन् यश दयालच्या गोलंदाजीतही धार दिसली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एकानेही अर्धशतक न झळकवता RCB च्या संघाने धावफलकावर लावलेल्या १९० धावा आणि या धावांचा गोलंदाजांनी केलेला बचाव ही गोष्ट संघाने एकजुटीनं विजय मिळवत चॅम्पिनयवाला रुबाब मिळवलाय हे स्पष्ट होते. पण तुम्हाला माहितीये का? RCB ची ट्रॉफी फिक्स होण्यात एक 'लक फॅक्टर'ही दिसून येतो. ज्याच्यासाठी आरसीबीच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख एवढा मोठा डाव खेळला होता. 

IPL 2025: आता मी लहान मुलाप्रमाणे झोप घेईन... पहिली IPL ट्रॉफी अन् 'विराट' सुख

'चॅम्पियन'वाला 'लक फॅक्टर'

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जोश हेजलवूडनं आरसीबीकडून सर्वोत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. १२ सामन्यात २२ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हाच तो आरसीबीचा लक फॅक्टर. कामगिरीसह त्याने संघाला साथ दिलीच. पण त्याच लकही RCB साठी फायद्याचे ठरल्याचे दिसते. आरसीबीच्या संघाने १२ कोटी ५० लाख रुपयांसह जोश हेजलवूडला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. कोट्यवधींची बोली लागलेल्या या खेळाडूच्या नावे एक खास रेकॉर्ड आहे. तो ज्या संघाकडून फायनल खेळलाय तो संघ जेतेपदाला कधीच मुकलेला नाही. त्याचा 'चॅम्पियन'वाला लक फॅक्टर RCB साठीही फायद्याचे ठरल्याचे दिसून येते. 

जोश हेजलवूड अन् फायनलमधील त्याचा चॅम्पियनचा रुबाब दाखवणारा खास रेकॉर्ड

जोश हेजलवूडनं २०१० मध्ये ऑस्ट्रेलिय अंडर १९ संघाकडून आपल्या  क्रिकेट कारकिर्दीतील पहिली फायनल खेळली. ज्यात ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली. २०१२ मध्ये तो चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धेत सिडन सिक्सर्सकडून मैदानात उतरला होता. यातही त्याचा संघ चॅम्पियन ठरला होता. २०१५ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली होती. या संघाचाही तो प्रमुख भाग होता. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये त्याने सिडनी सिक्सरचे प्रतिनीधीत्व  केले. यावेळी तो संघही जिंकला. आरसीबीच्या ताफ्यात सामील होण्याआधी हेजलवूड चेन्नई सुपर किंग्जकडूनही खेळला आहे. २०२१ च्या हंगामात चेन्नईचा संघ चॅम्पियन ठरला त्यावेळी ही फायनही तो खेळला होता. २०२२ मघ्ये ची-२० वर्ल्ड कप आणि २०२३ मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही तो ऑस्ट्रेलिय संघाचा भाग होता. या दोन्ही वळी ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पिनय ठरला. आता या यादीत आरसीबीचाही समावेश झालाय.   

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट