Join us
Daily Top 2Weekly Top 5

RCB Sold! आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी डील; पुरुष-महिला संघांसाठी १६,६६० कोटींची विक्रमी बोली

RCB संघाची जबाबदारी कोणाकडे? याचाही झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 03:14 IST

Open in App

IPL 2026 स्पर्धेच्या १९ व्या हंगामाला सुरुवात होण्याआधी राजस्थान रॉयल्सच्या विक्रमी डीलनंतर काही तासांच्या आत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विकत घेण्यासाठी ऐतिहासिक सौदा झाल्याची बातमी समोर आली. आदित्य बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील समुहाने जवळपास १६,६६० कोटी रुपयांसह (१.७८ बिलियन डॉलर) विक्रमी रक्कमेसह RCB चा संघ खरेदी केला आहे. RCB च्या संघ खरेदी करणाऱ्या समुहात टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट वेंचर्स आणि ब्लॅकस्टोनचे खासगी इक्विटी यूनिटचीही हिस्सेदारी आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB सर्वात महागडा संघ; पुरुष संघासह महिला संघाही नव्या समुहाचा

क्रिकबझच्या वृत्तानुसार, या ग्रुपने यूनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) सोबतच्या व्यवहारात RCB च्या संघाची १०० टक्के भागीदारी मिळवली आहे. या डीलमधील खास गोष्ट म्हणजे RCB च्या पुरुष संघासह महिला संघाची मालकीही नव्या समुहाची झाली आहे. या विक्रमी रक्कमेसह RCB चा संघ टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडा फ्रँचायझी संघ ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्स संघ १५३०० कोटी रुपयांत खरेदी करण्यात आला होता. RCB ची डील यापेक्षा मोठी आणि नवा विक्रम प्रस्थापित करणारी ठरली. 

IPL मधील पहिल्या चॅम्पियन संघाचा १५ हजार कोटींचा सौदा! कोण आहेत RR चे नवे मालक Kal Somani? जाणून घ्या सविस्तर

RCB संघाची जबाबदारी कोणाकडे? याचाही झाला खुलासा

नव्या डीलमध्ये RCB संघाचे नेतृत्व आणि जबाबदारी कोणाकडे असणार तेही स्पष्ट करण्यात आले आहे. आर्यमन विक्रम बिर्ला हे या फ्रँचायझी संघाचे अध्यक्ष (Chairman) तर टाइम्स इंटरनेटचे अध्यक्ष सत्यन गजवानी यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. डेविड ब्लिट्झर आणि विरल पटेल हे देखील या गुंतवणूक समुहाचा भाग आहेत. या विक्रमी व्यवहारानंतर कुमार मंगलम बिर्ला म्हणाले आहेत की, मागील जवळपास दोन दशकापासून IPL स्पर्धा ही जागतिक क्रीडा महासत्ता बनली आहे. या स्पर्धेनं भारतीय क्रिकेटचे चित्र पालटले आहे. RCB सह आम्ही हा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबद्ध राहू.

BCCI च्या मंजुरीची प्रतीक्षा

IPL स्पर्धेतील फ्रँचायझी संघाच्या खरेदीसंदर्भातील डील पक्की झाली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) यांच्याकडून अंतिम मान्यता मिळालेली नाही. अधिकृत मान्यता मिळाल्यावर RCB चा संघ नवी ओळख घेऊन मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.  

English
हिंदी सारांश
Web Title : RCB Sold! Record-breaking 16,660 Crore Deal in IPL History

Web Summary : Aditya Birla Group acquired RCB for ₹16,708 crore, including both men's and women's teams. Aryaman Birla is Chairman, Satyan Gajwani is VP. BCCI approval pending.
टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीग