BAN vs WI Romario Shepherd Hat Trick In T20I : वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील अष्टपैलू रोमारियो शेफर्ड याने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला. चट्टोग्रामच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ४ षटकांच्या कोट्यात ३६ धावा खर्च करताना रोमारियो शेफर्डनं ३ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विकेटचं खातं उघडल्यावर कॅरेबियन गोलंदाजाने स्पेलच्या अखेरच्या षटकात बॅक टू बॅक विकट घेत हॅटट्रिकचा डाव साध खास विक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधणारा तो वेस्ट इंडिजचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेट झालेल्या तांझिद हसनसह या फलंदाजांची केली शिकार
बांगलादेशच्या डावातील १७ व्या षटकातील रोमारियो शेफर्ड याने बांगलादेशच्या ताफ्यातील नुरुल हसन याला अवघ्या एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. ही त्याची पहिली विकेट ठरली. १९ व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने सेट झालेल्या तांझिद हसन याला ८९ धावांवर बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शोरफुल इस्लाम याला आल्या पावली माघारी धाडत शेफर्डनं दुसऱ्या षटकात हॅटट्रिक पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
शेफर्ड आधी जेसन होल्डरनं केली होती अशी कामगिरी
शेफर्ड आधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाकडून पहिली हॅटट्रिक ही जेसन होल्डरच्या नावे आहे. कमालीचा योगायोग म्हणजे जेसन होल्डर हा देखील एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. २०२२ मध्ये घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याने वेस्ट इंडिजकडून पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. बारबाडोसच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात होल्डरनं क्रिस जार्डन (७) आदिल राशीद (०) आणि शाकिब महमूद (०) यांची विकेट घेत हॅटट्रिकचा पूर्ण केली होती. या सामन्यात त्याने ४ षटकात २७ धावा खर्च करताना इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. ही त्याची आंतराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी देखील आहे.