चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची ८६ धावांवर ६ अशी स्थिती होती. त्यामुळे इंग्लंड संघ १५० धावांवर तंबूत परतणार, असे वाटत होते. मात्र, मोईन अली आणि सॅम कुरन यांनी चांगली भागीदारी केली. या कसोटीत दोन युवा खेळाडूंनी चांगली चमक दाखवली. त्यात भारताचा जसप्रित बुमराह आणि दुसरा म्हणजे इंग्लंडचा सॅम कुरन. सामन्यात दुसऱ्या सत्राच्या शेवटी भारतीय गोलंदाज झटपट बळी घेण्यासाठी अधिक उतावळे दिसले. त्यामुळे त्यांनी गोलंदाजीवरील संतूलन गमावले. ऋषभ पंतकडून एक झेल सुटला. गोलंदाजांना संधी होती. मला वाटते, थोडी कमतरता जाणवली ती २३ वर्षीय पंत याच्यात. कमतरता नाही पण तो ह्यलेग साईडह्ण बाबत अजून परिपक्व झालेला नाही. त्याला शिकावे लागेल. मात्र, तो कमी वयाचा आहे. यष्टिरक्षक हा अनुभवातून शिकत असतो. स्विंग आणि सीमची मूव्हमेंट अधिक होती त्यामुळे यष्टिरक्षकाला कठीण जात होते. वर्चस्व मिळवण्यासाठी भारतासाठी फलंदाजांची भूमिका महत्त्वाची असेल. आतापर्यंत कोहलीसाठी ही मालिका शानदार ठरली आहे. गेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने चांगली गोलंदाजी केली, मात्र तो साहाय्यक गोलंदाज आहे. इशांत शर्मा, बुमराह हे दोघेही चांगले गोलंदाजी करीत आहे. मोहम्मद शमी भरकटत असला तरी तो बळी मिळवून देऊ शकतो. आश्विन हा दुसºया सत्रात महत्त्वाचा ठरेल, असे मला वाटते.भारतीय अॅथलेटिक्स योग्य मार्गावरभारतीय महिला हॉकी संघाने खूप चांगले प्रदर्शन करत २० वर्षांनी अंतिम फेरी गाठली. मात्र, पुरुष संघाला उपांत्य सामन्यात मलेशियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. अंतिम सामन्यात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. दुसरीकडे, अॅथलेटिक्समध्ये भारताने १९ पदके मिळवली. त्यामुळे कुठेतरी सुधारणा झाल्यासारखी वाटते. अॅथलेटिक्स संघटना योग्य मार्गावर आहे. कारण त्यांचा अध्यक्ष एक खेळाडू आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमारीवाला हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. माझ्या मते ही अशी एकमेव संघटना असेल.अयाझ मेमन(लेखक लोकमत समूहाचे संपादकीय सल्लागार आहेत)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय फलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल
भारतीय फलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 06:17 IST