रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  

Rohit Sharma wife Ritika Sajdeh News: गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही सिनेअभिनेत्यांसारखंच ग्लॅमर प्राप्त झालं आहे. त्यामुळे पेज थ्री कल्चरमध्ये त्यांचीही उठबस वाढली आहे. त्यामुळे ही मंडळी जिथे जिथे जाते तिथे तिथे त्यांच्याभोवती लोकांची वर्दळ होत असते. त्यातून कधी कधी हे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना चित्रविचित्र प्रसंगांनाही सामोरे जावे लागते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:52 IST2025-06-18T13:51:21+5:302025-06-18T13:52:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit Sharma's wife chased him to his house and started taking photos. Ritika's anger flared up after that... | रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  

रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  

गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही सिनेअभिनेत्यांसारखंच ग्लॅमर प्राप्त झालं आहे. त्यामुळे पेज थ्री कल्चरमध्ये त्यांचीही उठबस वाढली आहे. त्यामुळे ही मंडळी जिथे जिथे जाते तिथे तिथे त्यांच्याभोवती लोकांची वर्दळ होत असते. त्यातून कधी कधी हे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना चित्रविचित्र प्रसंगांनाही सामोरे जावे लागते.  आघाडीचा क्रिकेटपटू आणि भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिलाही नुकताच असाच अनुभव आला. एक व्यक्ती तिचा पाठलाग करत करत तिच्या घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे रितिकाचा संताप अनावर झाला.

त्याचं झालं असं की, रोहित शर्माची पत्नी रितिका हिचे फोटो काढत काढत एक फोटोग्राफर तिच्या घरापर्यंत पोहोचला. जेव्हा रितिका बिल्डिंगच्या आत जात होती तेव्हासुद्धा हा फोटोग्राफर फोटो काढत होता. त्यामुळे रितिकाला राग अनावर झाला. हे तू काय करत आहेत? हे फोटो का काढत आहेस? असं तिनं या फोटोग्राफरला विचारलं. त्यानंतर रितिकाने या फोटोग्राफरची चांगलीच हजेरी घेतली. त्यामुळे तो अखेरीस मागे हटला.

दरम्यान, या घटनेमुळे भारतात प्रसिद्ध व्यक्ती असण्यामुळे कधी कधी या व्यक्तीलाच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही अनेकदा विनाकारण त्रासाचा सामना करावा लागतो हे दिसून आले. तसेच आता रितिका सचदेहचा फोटोग्राफरला चार शब्द सुनावतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

Web Title: Rohit Sharma's wife chased him to his house and started taking photos. Ritika's anger flared up after that...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.