आयपीएल २०२६ च्या नव्या हंगामाच्या तयारीत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात खास वातावरण पाहायला मिळत आहे. संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी नुकतीच खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी MI चा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचं भरभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माला पाहून नीता अंबानी यांनी केलेली कमेंटचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओह माय गॉड रोहित! नीता अंबानी यांची रिअॅक्शन व्हायरल
मुंबई इंडियन्सने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन जो खास व्हिडिओ शेअर केलाय त्यात नीता अंबानी रोहितला म्हणताना दिसल्या की, "ओह माय गॉड, रोहित! मी तुला ओळखलंच नाही, तू अगदी यंग बॉयसारखा दिसतो आहेस, या शब्दांत नीता अंबानी यांनी रोहितच्या फिटनेसच कौतुक केलं. यावर रोहितनं स्मित हास्य दिल्याचे पाहायला मिळाले.
शब्दाला जागला हार्दिक पांड्या! वर्ल्ड कपसाठी मदत करणाऱ्या वानखेडेच्या ग्राउंड स्टाफला दिलं 'स्पेशल गिफ्ट'
रोहितचा 'फॅट टू फिट'चा प्रवास सर्वांनाच थक्क करून सोडणारा
गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माने आपल्या फिटनेसवर कठोर मेहनत घेतली आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिटमॅन रोहित शर्मानं 'फॅट टू फिट'चा प्रवास सर्वांनाच थक्क करून सोडणारा आहे. मनावर घेतलं तर ३९ व्या वर्षीही आहार आणि व्यायामवर भर देऊन परफेक्ट फिटनेसचं गोल साध्य करता येते, हेच त्याने दाखवून दिले आहे.
परफेक्ट फिटनेसच्या जोरावर हिटमॅन हंगाम गाजवेल, अशी अपेक्षा
रोहित शर्मा हा आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेत सक्रीय आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने यंदाच्या हंगातील IPL स्पर्धा त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. फिटनेसवर काम केल्यापासून रोहित पुन्हा आपल्या जुन्या तोऱ्यात खेळताना पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाप्रमाणेच तो आता MI संघाचाही कर्णधार नाही. पण आजही तो या फ्रँचायझी संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. यंदाचा हंगामात त्याचा हिट शो पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
रोहित शर्माचा IPL मधील रेकॉर्ड एकदम झक्कास
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूपैकी एक आहे. सहावेळा IPL ट्रॉफी उंचावणाऱ्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहित शर्मा विराट पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.