Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार!

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे, असं मत आकाश चोप्रानं मांडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:14 IST

Open in App

Aakash Chopra on Rohit Sharma And Mumbai Indians :  भारताचा माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध  समालोचक आकाश चोप्रा याने मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यासंदर्भात एक मोठा दावा केला आहे. हिटमॅन रोहित शर्माचामुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे, असं मत आकाश चोप्रानं मांडले आहे. आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त होताना आकाश चोप्रानं  ही मोठी भविष्यवाणी केली आहे. 

MI नं दिली होती रोहितला रिटेन करण्याची हिंट, आकाश चोप्राचं मत खूपच वेगळं

आयपीएलच्या आगामी मेगा लिलावाआधी कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करेल, यासंदर्भात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळणार की नाही? हा देखील एक चर्चेचा मोठा विषय आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने यासंदर्भात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना खास हिंट दिली होती. MI च्या अधिकृत सोशल अकाउंटवरुन रोहित शर्मासह अन्य काही स्टार खेळाडूंना फ्रेममध्ये घेत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. ही फ्रेम MI चं रोहितवरील प्रेम कायम असून आगामी हंगामात तो याच संघाकडून मैदानात उतरेल, याचे संकेत देणारी होती. पण आकाश चोप्रा यांना तसं वाटत नाही.

नेमकं काय म्हणाला आहे आकाश चोप्रा

मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माला रिटेन करेल, असे वाटत नाही. यासंदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. पण मला वाटते की, त्याचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपला आहे. त्यामुळे त्याला रिलीज केले जाईल. तो लिलावातही दिसणार नाही, असे वाटते. कारण ट्रेंड विंडोच्या माध्यमातून तो फ्रेंचायझीला जॉईन होऊ शकतो, असा अंदाजही आकाश चोप्रानं व्यक्त केलाय. 

सूर्या MI कडूनच खेळेलआकाश चोप्रा याने रोहित मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार नाही, असा अंदाज बांधताना सूर्यकुमार यादव मात्र याच संघाकडून खेळेल, असे म्हटले आहे. सूर्या कुठेचं जात नाही. तो मुंबई इंडियन्ससोबतच कायम राहिल, असे मत आकाश चोप्राने मांडले आहे. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल २०२४