इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने १३ वर्षांचा दुष्काळ संपवत विजयी सलामी दिली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघावर पराभवाच्या हॅटट्रिकची नामुष्की ओढावली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील MI संघाने आतापर्यंतच्या चार सामन्यात फक्त एकच विजय मिळवला आहे. त्यात आता रोहित शर्माच्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मा पुढच्या सामन्यात खेळणार का?
RCB विरुद्धच्या लढतीत सलग तिसऱ्या पराभवासह रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. स्नायू दुखापतीमुळे वानखेडेच्या मैदानातील सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला होता. आता त्याच्या स्कॅन रिपोर्टवरुनच तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही ते स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आधीच संघर्ष करत असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढले आहे.
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
यंदाच्या हंगामात कशी राहिलीये रोहितची कामगिरी
मुंबई इंडियन्सच्या डावातील सहाव्या षटकातील दुसरा चेंडू खेळल्यावर रोहित शर्मा स्नायू दुखापतीच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे दिसले. रिटायर्ड हर्ट झाल्यावर तो पुन्हा मैदानात फलंदाजीला आलाच नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर MI साठी हा मोठा धक्का ठरले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील अर्धशतकासह यंदाच्या हंगामातील ४ सामन्यात १३७ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माच्या दुखापतीसह बुमराहच्या फॉर्मची चिंता
रोहित शर्माच्या दुखापतीशिवाय जसप्रीत बुमराहचा खराब फॉर्म हा देखील मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पहिल्या चार सामन्यात त्याला एकही विकेट मिळालेली नाही. यंदाच्या हंगामात कमबॅ करुन प्लेऑफ्सचं तिकीट मिळवायचं असेल तर उर्वरित १० सामन्यात MI ला किमान ६ सामने जिंकावे लागतील. सध्याच्या घडीला संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानावर असून १६ एप्रिलला पंजाब किंग्सविरुद्धच्या विजयासह ते घरच्या मैदानात धमाकेदार कमबॅक करण्यासाठी मैदानात उतरतील.
Web Summary : Mumbai Indians face challenges as Rohit Sharma's injury adds to their woes after a shaky start to the IPL season. His availability for the next match is uncertain, increasing pressure on the team already struggling with form.
Web Summary : मुंबई इंडियंस के लिए रोहित शर्मा की चोट एक और चुनौती है, जो आईपीएल सीजन की शुरुआत में ही सामने आ गई है। अगले मैच में उनकी उपलब्धता अनिश्चित है, जिससे पहले से ही संघर्ष कर रही टीम पर दबाव बढ़ गया है।