Join us

IPL 2021: रोहित शर्माचा मोठा खुलासा! मुंबई इंडियन्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार ते सांगितलं...

IPL 2021, Rohit Sharma: पाच वेळा आयपीएलचं (IPL) जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी यंदाचं सीझन निराशाजनक राहिलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:38 IST

Open in App

नवी दिल्ली-

पाच वेळा आयपीएलचं (IPL) जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघासाठी यंदाचं सीझन निराशाजनक राहिलं. असं असलं तरी आयपीएलमध्ये आजवरचा सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जातं. कर्णधार रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या आजवरच्या यशाचे शिलेदार समजले जातात. आता आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. यात दोन नवे संघ स्पर्धेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आयपीएलमधील सर्वच संघांनी नव्यानं बांधणी केली जाणार आहे. 

मुंबई इंडियन्स संघात पुढच्या वर्षी कोणते खेळाडू पुन्हा पाहायला आवडतील असं रोहित शर्माला विचारण्यात आलं असता त्यानं काही खेळाडूंची नावं घेतली आहे. रिटेशन पॉलिसी किंवा मग लिलावाच्या माध्यमातून मुंबईच्या फ्रँचायझीनं संघाचे प्रमुख खेळाडू पुन्हा एकदा मिळवावेत असं मत रोहित शर्मानं व्यक्त केलं आहे. यात रोहितनं सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांची नावं घेतली आहे. अर्थात रोहित शर्माला याचीही कल्पना आहे की संघातील सर्वच खेळाडू रिटेन करता येणार नाहीत. पण त्यानं संघाचा कोअर भाग आहे तसाच राहावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

रोहित शर्मा २०११ सालापासून मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला. त्यानंतर २०१३ साली संघाचं नेतृत्व रोहितच्या हाती आलं आणि त्याच वर्षी जेतेपदही प्राप्त केलं. यंदाच्या सीझनमधील निराशाजनक कामगिरीचा वारंवार विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण संघात चॅम्पियन खेळाडू आहेत. सर्वच दिवस तुमच्यासाठी सारखे नसतात, असं रोहित म्हणाला. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२१रोहित शर्मा
Open in App