नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतून संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडिया कॅरेबियन संघाशी भिडत आहे. आशिया चषकापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. या मंदिर भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खरं तर अद्याप आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला नाही.
दरम्यान, आशिया चषक २०२३ च्या आधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. आगामी स्पर्धेत भारत आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध मैदानात असणार आहे.
२ सप्टेंबरला भारत विरूद्ध पाकिस्तान थरार
३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान व श्रीलंका येथे आशिया चषक खेळवला जाणार आहे. BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर ACC ने ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तानात ४ व श्रीलंकेत ९ सामने होणार आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत होतील. भारतीय वेळेनुसार हे सामने दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होतील. पाकिस्तान, भारत आणि नेपाळ अ गटात आहेत, तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे.
आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल