Rohit Sharma-Virat Kohli: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निर्णायक भूमिका राहिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची नाबाद भागीदारी करत भारतीय संघाला 237 धावांचे लक्ष्य सहज पार करून दिले. ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली खरी, मात्र तिसऱ्या सामन्यातील विजयाने भारताला क्लीन स्वीप होण्यापासून रोखले.
RO-KO पुन्हा खेळताना दिसणार का?
या मालिकेनंतर आता रोहित आणि विराट पुन्हा खेळताना दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. विराट आणि रोहित आधीच T20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले असून, आता ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत आहेत. सध्या भारताची पुढील एक महिन्यात कोणतीही वनडे मालिका नाही, त्यामुळे हे दोन्ही दिग्गज खेळाडू एक महिन्याचा ब्रेक घेणार आहेत. भारताचा पुढील वनडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबरमध्ये होणार आहे.
रोहित-विराटबाबत शुबमन गिल काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिल याला रोहित आणि विराटच्या भविष्याबाबत विचारले असता, तो म्हणाला, “सध्या याबाबत कोणती चर्चा झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका (6 डिसेंबर) संपल्यानंतर आणि न्यूझीलंड मालिकेपूर्वी (11 जानेवारी 2026) मोठे अंतर आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गजांबाबत तेव्हाच योग्य निर्णय घेतला जाईल.”
भारत-दक्षिण आफ्रिका शेड्यूल
पहिला कसोटी सामना: 14 ते 18 नोव्हेंबर, कोलकाता
दुसरा कसोटी सामना: 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी
पहिला वनडे: 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा वनडे: 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा वनडे: 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला T20: 9 डिसेंबर, कटक
दुसरा T20: 19 डिसेंबर, अहमदाबाद
भारत- न्यूझीलंड शेड्यूल
पहिला वनडे: 11 जानेवारी, वडोदरा
शेवटचा वनडे: 18 जानेवारी, इंदूर
T20 मालिका: 21 ते 31 जानेवारी दरम्यान
देशांतर्गत स्पर्धेतून सराव राखण्याची शक्यता
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या फलंदाजीची लय कायम ठेवण्यासाठी रोहित आणि कोहली देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसू शकतात.