खामोशssss....!! लेक झोपेतून उठू नये म्हणून 'फॅमिली मॅन' रोहितने फॅन्सना केलं 'गप्प'; पाहा Viral Video

Rohit Sharma daughter Samaira Viral Video: रोहित शर्मा विविध कारणांमुळे चर्चेत असतो पण सध्या तो लेकीसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 04:25 PM2024-04-06T16:25:34+5:302024-04-06T16:26:29+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma video viral as he tells fans to shut up as daughter Samaria is sleeping gives family man vibes IPL Mumbai Indians | खामोशssss....!! लेक झोपेतून उठू नये म्हणून 'फॅमिली मॅन' रोहितने फॅन्सना केलं 'गप्प'; पाहा Viral Video

खामोशssss....!! लेक झोपेतून उठू नये म्हणून 'फॅमिली मॅन' रोहितने फॅन्सना केलं 'गप्प'; पाहा Viral Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Viral Video, daughter Samaira Sleeping, IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. खरे पाहता रोहित शर्मा हे नाव कायमच चर्चेत असते पण IPL सुरु झाल्यापासून त्याचे नाव वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधार बनवल्यानंतर संघाचे दोन गट झाल्याचा दावा केला जात आहे. रोहित शर्मा आणि त्याला मानणारा गट हा हार्दिकच्या गटापासून अंतर ठेवून असतो असेही बोलले जात आहे. अशा परिस्थितीत एका व्हायरल व्हिडीओत रोहित शर्मा एका चांगल्या आणि वेगळ्या कारणाने चर्चेचा भाग बनला आहे.

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये आणि IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकत आहे. रोहित शर्मा IPL 2024 मध्ये केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे, कारण या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. रोहितने या आयपीएल मोसमात आतापर्यंत ३ सामने खेळले असून ६९ धावा केल्या आहेत. पण तो सध्या लेकीसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

रोहितचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या रोहितच्या व्हिडीओमध्ये त्याची लेक समायरा झोपलेली दिसते. आपली मुलगी समायरा हिला आपल्या कडेवर घेऊन तो चालताना दिसतो. तर त्याची पत्नी रितिका त्याच्या मागून चालत येताना दिसते. व्हिडीओचे लोकेशन पाहता तो एखाद्या विमानतळावरून बाहेर पडतोय, असे दिसते. तो एका ठिकाणाहून बाहेर पडतो आणि आपल्या कारमध्ये बसतो. हा पूर्ण व्हिडीओ आहे. पण तिथे उपस्थित असलेले चाहते मंडळी रोहितचे लक्ष वेधण्यासाठी ओरडाआरडा करतात. त्याक्षणी तो साऱ्यांना गप्प राहण्याचा इशारा करतो. तोंडावर बोट ठेवून तो सगळ्यांना समायरा झोपली असल्याने आवाज करू नका असे सांगतो. त्याचे हावभाव आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचीच मने जिंकत आहे.

दरम्यान, रोहित शर्माने IPL 2024 मध्ये आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण ६९ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून सलामीच्या सामन्यात रोहितने ४३ धावा केल्या होत्या. त्याने २९ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने या धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रोहितने १२ चेंडूत २६ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मात्र तो खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.

Web Title: Rohit Sharma video viral as he tells fans to shut up as daughter Samaria is sleeping gives family man vibes IPL Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.