Join us

नको तिथं लाराची बरोबरी! हिटमॅन रोहित शर्मा विक्रमी १२ व्या वेळा ठरला कमनशिबी कॅप्टन

रोहित शर्मा हा सलग १२ वेळा टॉस गमावणारा कॅप्टन ठरलाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 15:00 IST

Open in App

Rohit Sharma Unwanted Record Most Consecutive Tosses Lost :  भारत-न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या यंदाच्या हंगामातील जेतेपदासाठीचा फायनल सामना दुबईच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस गमावला. वनडेत भारतीय संघानं सलग १५ व्या वेळी टॉस टॉस गमावला असून रोहित शर्मा हा सलग १२ वेळा टॉस गमावणारा कॅप्टन ठरलाय. वनडेत सलग  सर्वाधिक वेळा टॉस गमावणाऱ्या कॅरेबियन दिग्गज ब्रायन लाराच्या नकोशा विक्रमाची त्याने बरोबरी केलीये. पुन्हा एकदा टॉस गमावल्यावर रोहित शर्मालाही हसू अनावर झाल्याचा सीनही मैदानात पाहायला मिळाला. मग त्याने टॉस जिंकला नसला तरी मॅच जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

न्यूझीलंडनं साधला अपेक्षित डाव

रोहित शर्मा हा गेल्या काही वनडे सामन्यातून सातत्याने टॉस गमावताना दिसतोय.आयसीसी फायनलमध्ये अंतिम सामन्यात एक वेगळा दबाव असतो. त्यामुळे टॉसचं महत्त्व वाढते. दुबईच्या मैदानात जो संघ टॉस जिंकेल, तो धावांचा पाठलाग करण्यापेक्षा पहिल्यांदा बॅटिंग करून टेन्शन फ्री होण्याचा डाव खेळेल, ही अपेक्षा होती. झालेही तेच. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनं टॉस जिकून पहिल्यांदा बॅटिंग करत टार्गेट सेट करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या संघानं हा निर्णय घेण्यामागे याआधी भारतीय संघाविरुद्ध पदरी पडलेले अपयशही आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अडखळला होता. हा मानसिक दबाव घेऊन पुन्हा धावांचा पाठलाग करण्यापेक्षा त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग करण्याला पंसती दिलीये. 

भारतीय संघाचा टॉस गमावण्याचा सिलसिला कायम 

  •     १९ नोव्हेंबर २०२३ आयसीसी वनडे वर्ल्ड कप भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
  •     १७ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  •     १९ डिसेंबर २०२३ भारत वि दक्षिण आफ्रिका
  •     २१ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  •     ०२ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  •     ०४ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  •     ०७ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  •     ६ फेब्रुवारी २०२५  भारत विरुद्ध इंग्लंड
  •     ९ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
  •     १२ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
  •     २० फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध बांगलादेश आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश
  •     २३ फेब्रुवारी २०२५  भारत विरुद्ध पाकिस्तान  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध पाकिस्तान
  •     २ मार्च २०२५ भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध पाकिस्तान
  •    ४ मार्च, २०२५ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (सेमी फायनल) भारत विरुद्ध पाकिस्तान
  •    ९ मार्च, २०२५ भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल)
टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंडचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघ