Join us

मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!

जेव्हा रोहितची कार मुंबईच्या वाहतुकीत थांबली, तेव्हा हिटमॅननेही चाहत्याला अंगठाही दाखवला (थम्स अप केले)...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:18 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर हिटमॅन रोहित शर्मा नुकताच नव्या लॅम्बोर्गिनीमधून मुंबईच्या रस्त्यांवर ड्राइव्हिंग करताना दिसून आला. रोहितकडे Lamborghini Urus SE आहे. या कारच्या ऑरेंज कलरच्या मॉडेलमध्ये स्वतः रोहित ड्राइव्हिंग सीटवर बसलेला होता. लॅम्बोर्गिनीच्या या लक्झरीअस कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 4.57 कोटी रुपये एवढी आहे. रोहितचा या कारमधून फिरतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

भारताच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. रोहितने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो सध्या एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. भारताची पुढील एकदिवसीय मालिका ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे. तत्पूर्वी, रोहित शर्माला मोठी सुट्टी अथवा ब्रेक मिळाला आहे. रोहित त्याच्या नवीन कारमध्ये मुंबईच्या रस्त्यांवरून फिरताना दिसत आहे. त्याच्या एका चाहत्याने त्याचा लॅम्बोर्गिनी कार चालवतानाचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आता हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे.

चाहत्यांना केले 'थम्स अप' -रोहित शर्माला त्याच्या चाहत्यांनी मुंबईतील रस्त्यांवर आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. जेव्हा रोहितची कार मुंबईच्या वाहतुकीत थांबली, तेव्हा हिटमॅननेही चाहत्याला अंगठाही दाखवला (थम्स अप केले). एवढेच नाही तर, रोहित मुंबईतील रस्त्यांवर त्याच्या नव्या लक्झरीअस कारची स्पीड तपासतानाही दिसला.

एकदिवसीय सामन्यांत खेळत राहणार रोहित शर्मा -तत्पूर्वी, रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांतूनही निवृत्त घेणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, या सर्व गोष्टी फेटाळून लावत, रोहित एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगले खेळत असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :रोहित शर्माकारलँबॉर्घिनीभारतीय क्रिकेट संघ