Rohit Sharma spends quality time with his kids: भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर यावर्षी भारताने आणखी एक ICC ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सलग दोन ICC स्पर्धा जिंकण्याचा धमाकेदार विक्रम रोहितच्या टीम इंडियाने केला. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा सामनावीर रोहित शर्माच ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २५१ धावा केल्या होत्या. २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने ७६ धावांची अप्रतिम खेळी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतासाठी खेळून झाल्यावर आता रोहित आपल्या दोन चिमुकल्या लेकरांसोबत वेळ घालवत आहे. त्यासंबंधीचा क्यूट फोटोही त्याने पोस्ट केला आहे.
भारताने मोठी स्पर्धा जिंकली. आता २२ मार्चपासून IPL 2025 सुरु होईल. त्यामुळे रोहित शर्मा आता आपल्या मुंबईतील घरी छान निवांत वेळ घालवतो आहे. याचदरम्यान, रोहितने एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये रोहित आपल्या बाळाला कडेवर घेऊन खेळवत आहे. तसेच रोहितची मोठी मुलगी समायरा ही देखील आपल्या बाबाशी खूप छान खेळताना दिसत आहे. घराच्या बाल्कनीच्या एरियामध्ये रोहित आपल्या दोन मुलांसोबत 'क्वालिटी टाइम' एन्जॉय करताना दिसतोय. त्याच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा भरपूर पाऊस पडताना दिसतोय.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यावर रोहित वनडे क्रिकेटला रामराम ठोकेल अशा चर्चांनी जोर धरला होता. पण स्पर्धा जिंकल्यानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितने स्पष्टपणे सांगितलं की, कुणीही कुठल्याही अफवा पसरवू नका. मी कुठेही जाणार नाहीये. मी एवढ्यात निवृत्त होणार नाहीये. इतकेच नव्हे तर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने रोहितची मुलाखत घेतली. त्यावेळी रोहितला तिने निवृत्तीनंतरचा प्लॅन विचारला. तेव्हाही रोहितने सांगितले की, मी अजून निवृत्तीचाच विचार केलेला नाही, त्यामुळे त्यापुढचा प्लॅन आता सांगणं शक्य नाही. रोहितच्या या उत्तरानंतर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग आणि आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या दोघांनीही रोहितच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. रोहित अजूनही चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे त्याने अजिबात निवृत्त होऊ नये, असे दोघांनीही रोखठोकपणे म्हटले आहे.
Web Title: Rohit Sharma spends quality time with his kids ahead of IPL 2025 In Picture Winning Champions Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.