Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Hazare Trophy सामन्यादरम्यान रोहित शर्माला चक्क वडापावची ऑफर; त्यावर हिटमॅनची मजेशीर रिअ‍ॅक्शन (VIDEO)

फिटनेसवर मेहनत अन् फलंदाजीत धमाका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:32 IST

Open in App

Rohit Sharma Reacts As Fan Asked Him To Have Vada Pav During Vijay Hazare Trophy Match : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त वनडेत सक्रीय आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तो देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मुंबई विरुद्ध सिक्कीम यांच्यातील लढतीत रोहित शर्माची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् हिटमॅन रोहितला वडापावची ऑफर

७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करत त्यानं दीडशतकी खेळी करत चाहत्यांची मनं जिंकली. याच सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना एका चाहत्याने रोहितला थेट ‘वडापाव खाणार का?’ असा सवाल केला. त्यावर हिटमॅनने दिलेली मजेशीर प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...

मुंबईकर बॅटरनं अशी दिली रिअ‍ॅक्शन 

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सिक्कीमच्या फलंदाजीवेळी हिटमॅन रोहित शर्मा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. त्यावेळी एका चाहत्याने थेट मुंबईकराला वडापावची ऑफर दिली. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात स्टेडियमवर उपस्थित एका चाहता हिटमॅनला विचारतो की,  "रोहित भाई, वड़ा पाव खाओगे क्‍या?"  यावर रोहित शर्मानं हातवारे करून त्या चाहत्याला नको असा रिप्लाय दिला. त्यामुळेच हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

फिटनेसवर मेहनत अन् फलंदाजीत धमाका 

IPL मध्ये मुंबईकडून खेळताना रोहित शर्माला मुंबईचा राजा या टॅगसह 'वडापाव'  संबोधले गेले आहे. हिटमॅनच्या फॅटला वडापाव कारणीभूत आहे, अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. रोहितही या गोष्टी मजेशीर अंदाजात घेतो. सध्याच्या घडीला रोहित फिट अन् हिट शोची झलक दाखवून देत आहे. ३८ वर्षीय रोहित शर्मा  ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून धमाक्यावर धमाका करत आहे. जवळपास ११ किलो वजन कमी करून मैदानात उतरल्यापासून त्याच्या फलंदाजीचा आलेख चांगलाच उंचावल्याचे दिसते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fan offers Vada Pav to Rohit Sharma during Vijay Hazare Trophy

Web Summary : During a Vijay Hazare Trophy match, a fan offered Rohit Sharma Vada Pav. The Mumbai batsman humorously declined the offer, a video of which went viral. Sharma, who is focused on his fitness, recently scored a century in the tournament.
टॅग्स :विजय हजारे करंडकरोहित शर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ