Join us  

Rohit Sharma New Look : एवढा बेचैन का झालायस?, रोहितच्या किलर लूकवर बायकोची कमेंट, अन्...

Rohit Sharma New Look : रोहित शर्मानं आपल्या इन्स्टाग्रामवर नवा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लहान मुलाचं इमोजी ठेवलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 9:10 AM

Open in App

Rohit Sharma New Look : भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार (ODI) रोहित शर्मा (Rohit Sharma) हाताच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. रोहित शर्मा सध्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये त्याच्या फिटनेसवर (Fitness) काम करत आहे. रोहित शर्माने इंस्टाग्रामवर (Instagram) एक नवीन फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एका नव्या लूकमध्ये दिसत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार (एकदिवसीय) रोहित शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. क्रिकेटची माहिती असो किंवा आपले फोटोस तो या माध्यमातून सातत्यानं शेअर करत असतो. रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये 'हिटमॅन' एका नव्या लूकमध्ये दिसत आहे. तो या फोटोत क्लिन शेव्हमध्ये दिसतोय. रोहितच्या चाहत्यांना त्याचा नवा लूक अतिशय आवडल्याचंही दिसत आहे.रोहितच्या पत्नीची मजेशीर कमेंटरोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोवर त्याची पत्नी रितिका सजदेहने मजेशीर कमेंट केली आहे. 'इतका बेचैन का झालायस?' अशी कमेंट रितिकानं केली आहे. तर खलील अहमदने हा लूक अंडर-१९ चा असल्याचं लिहिलं आहे. सूर्यकुमार यादव यांनंही त्याच्या या नव्या लूकवर 'चकाचक' असं कमेंट केलंय. रोहित शर्माचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

टॅग्स :रोहित शर्मासोशल मीडियाइन्स्टाग्राम
Open in App