Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

इशान किशननेही गमतीशीर अंदाजात दिलं उत्तर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 18:30 IST2022-12-11T18:30:17+5:302022-12-11T18:30:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rohit sharma over ishan kishan double hundred against bangladesh odi cricket | Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

भारताचा स्टार फलंदाज इशान किशन सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने झंजावाती द्विशतक ठोकून सर्वांचीच मनं जिंकली. त्याने आपल्या फलंदाजीने बांगलादेश संघाच्या गोलंदाजांचे अक्षरशः कंबरडे मोडले. ईशानने द्विशतक झळकावल्यानंतर, अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्याचे कौतुक केले आहे. आता भारतीय कर्णधार रोहित शर्मानेहीइशान किशनच्या शतकावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा
रोहित शर्माने इंस्टाग्रामवर इशान किशनचा फोटो पोस्ट करत लिहिले आहे, 'या क्लबची मजा वेगळी आहे. इशान किशन.’ यानंतर इशान किशननेही गमतीशीर अंदाजात उत्तर देताना लिहिले, ‘मजाच मजा आहे.’ इशान आणि रोहित शर्मा दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. इशान किशन हा रोहित शर्माच्या फेव्हरिट प्लेयर्स पैकी एक मानला जातो.

ठोकले द्विशतक -
बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात इशानने 131 चेंडूंचा सामना करत 210 धवांची जबरदस्त खेली केली. आपल्या खेळीत त्याने 24 चौका आणि 10 षटकारही लगावले. इशानने आपल्या सुरुवातीच्या 100 धावा 85 चेंडूत फटकावल्या. तर पुढच्या 100 धावा त्याने केवळ 41 चेंडूतच केल्या. याच वेळी इशानने विश्वविक्रमही केला आहे. आता तो जगातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा फलंदाज ठरला आहे.


 

 

Web Title: Rohit sharma over ishan kishan double hundred against bangladesh odi cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.