दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; अगरवाल, गिल यांना मिळू शकते संधी

वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 01:58 AM2020-02-04T01:58:00+5:302020-02-04T06:20:32+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma out of New Zealand tour due to injury; Agarwal, Gill gets the chance | दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; अगरवाल, गिल यांना मिळू शकते संधी

दुखापतीमुळे रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; अगरवाल, गिल यांना मिळू शकते संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ‘हिटमॅन’ रोहित शर्माला माऊंट मोनगानुईमध्ये पाचव्या व अखेरच्या टी२० सामन्यादरम्यान पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी एकदिवसीय व कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागणार आहे. भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहितला स्नायूच्या दुखापतीचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे तो मालिकेतून बाहेर झाला असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले. ४१ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘तो दौºयातून आऊट झाला आहे. सध्या त्याची स्थिती विशेष चांगली भासत नाही. फिजिओ त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. दुखापतीचे स्वरूप किती गंभीर आहे, याबाबत नंतर माहिती मिळेल. पण तो मालिकेतील उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाही.’ भारतीय संघ बुधवारपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, तर त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होईल.

रोहित दुखापतग्रस्त झाल्यानंतर मयांक अगरवालचा एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेटमध्ये राखीव सलामीवीर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही तो राखीव सलामीवीर फलंदाज होता. न्यूझीलंड ‘अ’विरुद्ध भारत ‘अ’ संघांच्या सध्या सुरू असलेल्या अनौपचारिक कसोटी मालिकेत द्विशतकी खेळी करणाऱ्या शुभमन गिल यालाही संघात स्थान मिळू शकते.

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती पर्यायी खेळाडूच्या नावाची घोषणा करेल. पण त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. कारण निवड समितीचे समन्वयक बीसीसीआय सचिव जय शाह खजिनदार अरुण धुमलसह न्यूझीलंडला जात आहेत. सूत्राने सांगितले की, ‘सचिवांची स्वीकृती मिळाल्यानंतरच पर्यायी खेळाडूची घोषणा होेईल.’ कसोटीत अनुभवी लोकेश राहुलला सलामीची संधी मिळेल, तर राखीव सलामीवीर स्थानासाठी गिल व पृथ्वी शॉ दावेदार असतील.

उपचारादरम्यान रोहितला वेदना

रोहितची दुखापत किती गंभीर आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण सामन्यादरम्यान ज्यावेळी फिजिओ नितीन पटेल त्याच्यावर उपचार करीत होते त्यावेळी त्याला बऱ्याच वेदना होत असल्याचे दिसत होते. रोहितची दुखापत भारतासाठी मोठा धक्का आहे.

Web Title: Rohit Sharma out of New Zealand tour due to injury; Agarwal, Gill gets the chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.