Join us

यशस्वी जैस्वालचे ICC Test Ranking मध्येही दमदार पदार्पण, रोहित शर्माचा Highest Rank

ICC Test Ranking : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शतकवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीतही दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:22 IST

Open in App

ICC Test Ranking : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील शतकवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीतही दमदार कामगिरी केली आहे. रोहितने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी करून टॉप १० मध्ये एन्ट्री मारली आहे, तर पदार्पणवीर यशस्वीचेही आयसीसी क्रमवारीत दमदार पदार्पण झाले आहे. भारताने पहिल्या कसोटीत १ डाव व १४१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.

रोहितने त्या कसोटीत १०३ धावांची खेळी केली आणि तो आता १०व्या क्रमांकावर आला आहे. रिषभ पंत ११व्या आणि विराट कोहली १४व्या क्रमांकावर गेला आहे. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित सर्वाधिक रँकिंग पॉइंट्स घेणारा फलंदाज ठरला आहे.  ३८७ चेंडूंत १७१ धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या यशस्वीने क्रमवारीत ७३व्या स्थानावर पदार्पण केले आहे. २१ वर्षीय यशस्वी हा कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात भारताकडून सर्वोत्ता धावा करणाता तिसरा सलामीवीर ठरला होता आणि त्याला त्या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारानेही गौरविले गेले. 

रोहित व यशस्वी यांच्याव्यतिरिक्त भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेही गोलंदाजीत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. त्याने त्या सामन्यात १२ विकेट्स घेतल्या होत्या आणि या कामगिरीच्या जोरावर त्याच्या खात्यात २४ रेटींग पॉइंट्सची भर पडली आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर असेल्या पॅट कमिन्सला त्याने ५६ रेटींग पॉइंट्सने मागे टाकले आहे. रवींद्र जडेजानेही त्या कसोटीत पाच विकेट्स घेतले आणि तो ३ क्रमांकाच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर आला आहे.   

टॅग्स :यशस्वी जैस्वालरोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिजआयसीसी
Open in App