Join us

Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेआधी केलेल्या नवीन पोस्टची रंगली चर्चा; पत्नी रितिकानेही केली कमेंट

वेस्ट इंडिजचा संघ ६ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध खेळणार क्रिकेट मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:32 IST

Open in App

Rohit Sharma IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेची सुरूवात होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. ही मालिका खूप खास आहे, कारण टीम इंडियाचा नवा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेटमधील त्याच्या नव्या 'इनिंग'ची सुरूवात करणार आहे. त्यातही खास गोष्ट म्हणजे, मुंबई इंडियन्सचे दोन दमदार खेळाडू रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड यांच्याकडे आपापल्या संघाचे नेतृत्व असणार आहे. तशातच या मालिकेआधी रोहित शर्माने केलेल्या एका पोस्टची बरीच चर्चा रंगली आहे. तसेच, त्याच्या पत्नीनेही यावर कमेंट केली आहे.

रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोसोबत त्याने एक कॅप्शन लिहिलं आहे. 'आता नवीन सुरूवात करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही', असं ते कॅप्शन आहे. रोहित शर्माने पोस्टमध्ये स्वत:चा एक फोटोही टाकला आहे. रोहिच पाठमोरा उभा असून त्याची ओळख असलेली ४५ नंबरची जर्सी त्यात अधोरेखित करण्यात आली आहे आणि फोटोमध्ये रोहितचा एक वेगळाच स्वॅग दिसून येत आहे. त्यामुळे रोहितच्या या पोस्टची चांगलीच चर्चा सुरू आहे.

रोहितने ही पोस्ट करताच २ तासात या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव झाला. तसेच, अनेकांनी कमेंट्स करून त्याला शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सकडूनही त्याला सदिच्छा देण्यात आल्या. पण रोहितची पत्नी रितिका हिची कमेंट मात्र विशेष भाव खाऊन गेली. तिने रोहितबद्दलचं प्रेम पुन्हा एकदा जाहीर केलं. तसेच त्याला खास पद्धतीने कमेंट करून शुभेच्छा दिल्या.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच रोहित शर्माची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी तो न्यूझीलंडविरुद्ध टी२० कर्णधार म्हणून मालिका खेळला होता. पण आफ्रिका दौऱ्यावर त्याला जाता आलं नाही. अशा परिस्थितीत वन डे संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० आणि वन डे मालिका ही त्याची पहिली मोठी परीक्षा असणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माकिरॉन पोलार्डभारतीय क्रिकेट संघ
Open in App