दुबई: स्टार फलंदाज रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर कर्णधारपद सोडणार असल्याची सध्या चर्चा आहे. अशा परिस्थितीत, रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार कोण असेल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या, भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार शुभमन गिल आहे, परंतु तो थेट कर्णधार होऊ शकणार नाही, कारण निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला तर गिल उपकर्णधारपदी कायम राहील. पण जर गिल आणि हार्दिक यांच्यावर एकमत झाले नाही, तर अशा परिस्थितीत तिसरा दावेदारदेखील शर्यतीत उतरू शकतो. सध्यातरी तो दावेदार केएल राहुल असल्याची चर्चा आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- रोहित शर्मा वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता
रोहित शर्मा वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता
रोहितच्या जागी वनडे संघाचा कर्णधार कोण असेल हे बघणे औत्सुक्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:44 IST