Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्मा कसोटीस मुकणार; पण नेमके कारण काय? BCCIला दिली माहिती

याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित सर्व सामने खेळू शकेल, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 08:56 IST

Open in App

नवी दिल्ली: कर्णधार रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवातीच्या दोनपैकी एका कसोटीस मुकण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला रोहितने ही माहिती दिली असून त्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे म्हटले. 

भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची  मालिका खेळणार असून रोहित पहिला किंवा दुसरा सामना खेळू शकणार नाही. ‘याबाबत अद्याप स्पष्टता नाही मात्र मालिका सुरू होण्याआधी वैयक्तिक बाब निकाली निघाल्यास रोहित सर्व सामने खेळू शकेल,’ असे बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माबीसीसीआय