Join us

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी रोहितच्या मुंबई इंडियन्सने बनवला खास 'प्लॅन'

यंदाच्या हंगामात उद्या पहिल्यांदाच भिडणार मुंबई आणि चेन्नई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:52 IST

Open in App

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना कायमच रोमांचक असतो. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ IPL च्या इतिहासातील सर्वोत्तम संघ मानले जातात. यंदाच्या वर्षी या दोघांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. CSKचे ६ सामन्यात केवळ २ गुण आहेत. तर मुंबईला ६ सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत फॉर्मशी झगडत असलेल्या CSK विरूद्ध विजयी लयीत परतण्यासाठी रोहित शर्माच्या मुंबईने खास प्लॅन तयार केला आहे.

मुंबई चेन्नई ही लढत रोमांचक होणार हे नक्की. दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असल्यामुळे दोन्ही संघ दमदार कामगिरी करणार यात वादच नाही. आमच्या संघाची मोठी समस्या म्हणजे शेवटच्या षटकांमधील गोलंदाजांची कामगिरी (Death Overs). गोलंदाजीतील ही समस्या दूर करण्यासाठी आम्हाला एकत्रितपणे नीट विचार करावा लागणार आहे आणि सांघिक कामगिरीतून यावर तोडगा काढावा लागणार आहे. मैदानावर झटपट निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. दडपणाचा वापर चांगली कामगिरी करण्यासाठी करायला हवा आणि हाच आमचा प्लॅन असेल", अशी माहिती मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने दिली. त्याने आज पत्रकार परिषदेत काही प्रश्नांची उत्तरे दिली.

"मैदानात काही वेळा उत्स्फूर्तपणे निर्णय घ्यावे लागतात. स्वत:वर विश्वास ठेवून काही निर्णय घेतले जायला हवेत, पण गेल्या एक-दोन सामन्यात तसं होताना दिसत नाहीये. पण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सगळ्या प्रकारचे चढ-उतार पाहिले आहेत. आम्ही वाईट कामगिरीही पाहिली आहे. आम्ही विजेतेपदंही पटकावली आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आम्हाला आमचं डोकं शांत ठेवावं लागेल. पुढच्या प्रत्येक सामन्यात मैदानावर असलेल्या प्रत्येक खेळाडूला सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. दडपण असेल हे नक्की, पण त्या दडपणाच्या काळात तुम्ही किती शांतपणे परिस्थिती हाताळता, हे अधिक महत्त्वाचे आहे", असेही त्याने स्पष्ट केले.

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App