"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग

रिषभ पंतने दिलेला रिप्लाय सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:20 IST2025-06-06T14:17:34+5:302025-06-06T14:20:47+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Kaha Hain Rishabh Pant Says O Garden Mein Ghum Rahe Hai Hain Ahead India vs England Tour 2025 Watch Video | "तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग

"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG Rishabh Pant On Rohit Sharma Viral Video : आयपीएल स्पर्धेनंतर आता भारतीय संघातील खेळाडू ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत. या दौऱ्यावर शुभमन गिल पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याच्याशिवाय विकेट किपर बॅटर रिषभ पंत याच्यावर उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. इंग्लंडची फ्लाइट पकडण्यासाठी भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईच्या विमानतळावर एकत्रित पोहचले होते. यावेळी रिषभ पंतलारोहित शर्मासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेला रिप्लाय सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरताना दिसतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

रिषभ पंतला आठवला रोहितचा डायलॉग

रिषभ पंतसह भारतीय खेळाडू विमानतळावर आत जाण्यासाठी उभे होते. त्यावेळी एका चाहत्याने रोहित शर्मा कुठं आहे? असा प्रश्न भारतीय कसोटी संघाच्या उप कर्णधार असलेल्या रिषभ पंतला विचारला. यावर रिषभ पंत याने रोहितचा डायलॉग सुनावल्याचे पाहायला मिळाले. "वो गार्डन में घूम रहे हैं।" असा रिप्लाय पंतने दिला. सोशल मीडियावर पंतचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना

इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मासह विराट कोहलीनं घेतली कसोटीतून निवृत्ती

इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या जागी आता शुबमन गिलच्या खांत्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनंही कसोटीतून निवृत्ती घेतलीये. या दोघांच्या आधी आर अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटीतून निवत्ती घेतली होती. या तीन दिग्गजांच्या अनुपस्थितीत शुबमन गिल अँण्ड कंपनी कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.

रोहित फिल्डवरील बॅटिंगशिवाय डायलॉगबाजीनंही लक्षवेधून घ्यायचा

रोहित शर्मा मॅचवेळी आपल्या फलंदाजीसह मैदानात कॅप्टन्सी करत असताना खास डायलॉगबाजीसह लक्षवेधी राहिला आहे. खेळाडूचं मॅचमध्ये लक्ष नसेल तर क्या गार्डन मे घुमने आया है क्या... यासारखे डायलॉग मारत तो खेळाडूला जागे करताना पाहायला मिळाले आहे. आता त्याच्याशिवाय संघ इंग्लंडला रवाना झालाय. ज्यावेळी विमानतळावर पंतला रोहितसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी फार काही विचार न करताना पंतनं त्याचा फेसम डायलॉग मारल्याचे पाहायला मिळाले. 

Web Title: Rohit Sharma Kaha Hain Rishabh Pant Says O Garden Mein Ghum Rahe Hai Hain Ahead India vs England Tour 2025 Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.