IPL 2024 : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) खांद्यावर सोपवली. फ्रँचायझीचा हा निर्णय रोहित शर्माच्या चाहत्यांना आवडलेला नाही आणि ते स्टेडियमवर हार्दिकला ट्रोल करताना दिसत आहेत. रोहितनेही हात जोडून असं करून नका, असे आवाहन प्रेक्षकांना केले होते. पण, तरीही हार्दिकवरील राग काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. MI vs RCB लढतीत वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांनी हार्दिकच्या नावाचा शिमगा सुरू ठेवला होता, परंतु विराट कोहलीने बजावल्यानंतर हार्दिक हार्दिकचा जयघोष सुरू झाला.
RCB विरुद्धच्या सामन्यात MI च्या चाहत्यांकडून हार्दिकला Boo केले गेले. पण, यावेळी विराट कोहली चाहत्यांवर भडकला. त्याने हार्दिक हा भारतीय खेळाडू आहे, त्याच्याशी असं वागू नका असा सज्जड दम चाहत्यांना भरला. विराटच्या या कृतीने अनेक मनं पुन्हा जिंकली. स्टीव्ह स्मिथलाही चिडवणाऱ्या चाहत्यांना विराटने असाच दम भरला होता.
पण, या सामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत एका मुलीला प्रश्न विचारला गेला. तेव्हा ती
हार्दिक पांड्या हा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, प्रेक्षकांनी त्याच्यासोबत असं वागायला नको, असं ती म्हणत होती. पण, तितक्याच तिच्या मागे उभ्या असलेल्या मुलांमधून एक मुलगा पुढे आला अन्...