ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:10 PM2021-06-30T14:10:53+5:302021-06-30T14:11:25+5:30

Rohit Sharma has moved to No.6 in the ICC Test Rankings. Kane Williamson is back as No.1 Test batsman | ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

Next
ठळक मुद्देअष्टपैलू खेळाडूंमध्ये आर अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ( ३८४) व इंग्लंडचा बेन स्टोक्स ( ३७७) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. ( Kane Williamson is the new number 1 ranked Test batsman in the world) भारताविरुद्धच्या फायनलपूर्वी केननं कसोटी फलंदाजांतील अव्वल स्थान गमावले होते, परंतु फायनलमध्ये त्यानं दोन्ही डावांत ४९ व नाबाद ५२ धावा करून पुन्हा अव्वल स्थान पटकावले. आयसीसीनं आज जाहीर केलेल्या क्रमवारीत भारताच्या रोहित शर्मानंही ( Rohit Sharma) मोठा पराक्रम केला.


न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ९०१ गुणांसह अव्वल स्थानी आला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( ८९१), ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ( ८७८), टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( ८१२) आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( ७९७) टॉप फाईव्ह मध्ये आहेत. रोहित शर्मानं कारकीर्दितील सर्वोत्तम रेटींग पॉईंट्सची कमाई केली. त्यानं ७५९ गुणांसह सहावे स्थान पटकावताना रिषभ पंतला ( ७५२) मागे टाकले. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला खेळणाऱ्या फलंदाजांत रोहित टॉपवर आहे. ( Rohit Sharma moves to his highest rating points with 759, 6th ranked Test batsman and highest ranking for a Test opener currently in world cricket)

गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ( ९०८), भारताचा आर अश्विन ( ८६५), न्यूझीलंडचा टीम साऊदी ( ८२४), ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ( ८१६) आणि न्यूझीलंडचा निल वॅगनर ( ८१०) हे टॉप फाईव्हमध्ये आहेत. अष्टपैलू खेळाडूंमध्ये आर अश्विनला अव्वल स्थान गमवावे लागले. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ( ३८४) व इंग्लंडचा बेन स्टोक्स ( ३७७) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. आर अश्विन ३७७ व रवींद्र जडेजा ३५८ अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या, तर शाकिब अल हसन ( ३३८) पाचव्या क्रमांकावर आहे. ( Jason Holder becomes the new number 1 ranked Test all-rounder in the world) 

Web Title: Rohit Sharma has moved to No.6 in the ICC Test Rankings. Kane Williamson is back as No.1 Test batsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app